पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

х & о गीतारहस्य अथवा कर्मयोग येषां नोऽयमात्माऽयॆ लेोकः”’हुं वृहृदारण्यकोपनिषदांतीलसंन्यासपर वचन (बृ ४.४. २२), या दोहोंमधील साम्यहि आम्हा पूर्वी दाखविले आहे. खुद्द बायबलांतल्या या वाक्यांवरून जैन किंवा बौद्ध धर्माप्रमाणेच ख्रिस्ती धर्म मूळांत संसार सोडूनदेण्यास सांगणारा म्हणजे संन्यासपर अहि असें सिद्ध होतें;आणि ख्रिस्ती धर्माचा प्राचीन इतिहास पाहिला तर “ख्रिस्तभक्तांनी पैसारुका न ठेवितां रहावें” (माथ्यू.१०.९-१५) या ख्रिस्ताच्या उपदेशाप्रमाणेच पहिले ख्रिस्ती धर्मोपदेशकवैराग्यानें रहात होते, असें दिसून येतें. ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी किंवा ख्रिस्तभक्तांनी गार्हस्थ्यधर्मानें संसारांत रहाण्याचा प्रघात मागाहून झालेल्या सुधारणेचे फळ आहे, मूळू ख्रिस्ती धर्म नव्हे. अद्यापहि शोपेनहीएरसारखे संसार दुःखमय अतएव त्याज्य अॅसेंच प्रतिपादन करौत आहेत; आणि ग्रीस देशांत प्राचीनकाळीं तत्त्वविचारांत आयुष्य घालविणें श्रेष्ठ किंवा लोककल्याणार्थ राजकीय उलाढाली करणें श्रेष्ठ हा प्रश्न उद्भवला होता, हें पूर्वी सांगितलं आहे. सारांश, पाश्चात्याचा हा कर्मत्यागपक्ष आणि आमचेकडील संन्यासमार्ग हे दोन्ही बहुतेकांशीं एकसारखेच असून त्या मार्गाचे समर्थन करण्याची पाश्चात्य व पौरस्त्य पद्धतहि एकच आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. पण कर्मत्यागापेक्षां कर्ममार्ग श्रेष्ठ कां याचीं आधुनिक पाश्चिमात्य पंडित जीं कारणे दाखवितात त्यांपेक्षां गीतेंतील प्रवृत्तिमार्गाचे प्रतिपादन भिन्न असल्यामुळे त्यांतील भद येथे सांगितला पाहिजे जगांतील सर्व मनुष्यांचे किंवा पुष्कळ लोकांचे पुष्कळ सुख-अर्थात् ऐहिक सुख-हेंच काय तें या जगांतील परम साध्य ठरवून सर्वोच्या सुखाकरितां प्रयत्न करीत आपणहि त्याच सुखांत रंगून जाणेंहें प्रत्येकाचे कर्तव्य आह, असें पाश्चिमात्य आधिभौतिक कर्ममार्गायांचे म्हणणें आहे; आणि त्याच्या पुष्टीकरणार्थ संसारांत दुःखापक्षां एकंदरीत सुखच अधिक आहे असेंहि त्यांपैकीं बरेच पंडित प्रतिपादन करितात. अशा दृष्टीनें पाहिले म्हणजे पाश्चिमात्य

  • See Paulsen's System of Ethics, (Eng trans.) Book I. Chap. 2 and 3; esp. pp.89.97. “The new (Christian) converts seemed to renounce their family and country...their gloomy and austere aspect, their abhorrence of the common business and pleasures of life, and their frequent predictions of impending calamities inspired the pagans with the apprehension of some danger which

would arise from the new sect.” Historians' History of the World, Vol VI,p. 818. जर्मन कवि गएँटे यानें आपल्या Aaus८ (फौस्ट) नामक काव्यांतं “Thou shalt renounce ; That is the eternal song which rings in everyone's ears; which, our whole life-long every hour is hoarsely singing to us." Traigrama sma. (Faus, Part 1.11.1195-1198) मूळ खिस्ती धमै संन्यासपर होता याबद्दल दुसरेहि पुष्कळ आधार देतां येतील,