पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* é & गीतारहस्य अथवा कमेयोग धर्माच्या नियमांचा लौकिक किंवा बाह्य उपयोग काय याचा विचार केला तर हे नीतिधर्म सर्वभूतहितार्थ म्हणजे लोकांच्या कल्याणार्थच आहेत असेंहि महाभारतांत उघड सांगितले आहे. परंतु अव्यक्तावर अविश्वास असल्यामुळे तात्त्विक दृष्टया कायीकार्यनिर्णयास आधिभौतिक तत्त्वें अपुरीं पडतात हें जाणूनहित्यांतल्यात्यांतच शब्दजाल वाढवून पाश्चिमात्य आधिभौतिक पंडित व्यक्तानेंच ज्याप्रमाणे कसा तरी सर्व निर्वाह करून घेतात तसें न करितां, या तत्त्वांची परंपरा पिंडब्रह्मांडाच्या मूळ अव्यक्त व नित्य तत्त्वापर्यंत नेऊन मोक्ष, नीतिधर्म व व्यवहार या तिहींचीहि तत्त्वज्ञानाचे आधारें गीतेंत भगवंतांनी पूर्ण एकवाक्यता करून दाखविली आहे; व त्यामुळे कार्याकार्यनिर्णयार्थ जो धर्म सांगितला तोच मेाक्ष प्राप्त करून देण्यासहि समर्थ आहे, असें अनुगीतेच्या आरंभीं स्पष्ट म्हटले आहे (मभा.अश्व. १६.१२). मोक्षधर्म व नीतिशास्र, किंवा अध्यात्मज्ञान आणि नीति, यांची सांगड घालून देण्याचे कारण नाही, असें ज्यांचे मत असेल त्यांना या उपपादनाचे महत्त्व कळणार नाही. पण याबद्दल उदासीन नसणाच्या सर्व लोकांस गीतेंतील कर्मयोगाचे प्रतिपादन आधिभौतिक विवेचनापेक्षां श्रेष्ठ व ग्राह्य वाटल यांत शंका नाहीं. हिंदुस्थानदेशाप्रमाणें अध्यात्मज्ञानाची वाढ प्राचीन काळी दुसरी कोठेच झालेली नसल्यामुळे दुसच्या कोणत्याच देशांत कर्मयोगाचे अशा प्रकारचे आध्यात्मक उपपादन प्रथम निघणे शक्य नव्हतें व निघालेंहि नाहीं. इहलोकींचा संसार अशाश्वत असून त्यांत सुखापेक्षां दुःख अधिक हें कबूल असतांहि (गी.९.३३)-“कर्म ज्यायो ह्यकर्मणः”-संसारांत सर्व कर्माचा केव्हां तरी संन्यास करण्यापेक्षां तींच कर्मे निष्काम बुद्धीनें लोककल्याणार्थ करीत रहाण्याचा मार्ग अधिक श्रेयस्कर असा जो गीतेंत सिद्धान्त केला आह (गो.३.८:५.२), त्याच्या साधकबाधक कारणांचा विचार पूर्वी अकराव्या प्रकरणांत केला आहे. पण गीतेंतल्या या कर्मयोगाची पाश्चिमात्य कर्ममागीशीं, किंवा आमच्याकडील संन्यासमागीची पाश्चिमात्य कर्मत्यागपक्षाशी तुलना करीत असतां यासंबंधानें थोडा जास्त खुलासा करणे जरूर आहे. दु:खमय व निःसार संसारांतून निवृत्त झाल्याखेरीज मोक्षप्राप्त होत नाही, हें मत वैदिक धर्मात प्रथम उपनिषत्कारांनी व सांख्यांनीं प्रचारांत आणिलें. तत्पूर्वीचा वैदिक धर्म प्रवृतिपर म्हणजे कर्मकाण्डात्मकच होता. पण वैदिकतर धर्माचा विचार केला तर त्यांपैकी बहुतेकांतपहिल्यापासूनच संन्यासमागै स्वीकारिला आहे असें दिसून येतं. उदाहरणार्थ, जैन व बौद्ध हे दोन्ही धर्म मूळांतच निवृतिपर असून ख्रिस्ताचा उपदेशहितसाच आहे. “संसाराचा त्याग करून यतिधर्मानें रहार्वे व स्रियांकडे बघू नये अगर त्यांजवळ बोलू नये” असा बुद्धाचा आपल्या शिष्यांस ज्याप्रमाणे शेवटचा उपदेश आहे(महापरिनिब्बाण सुत.५.२३),