पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

イイー गीतारहस्य अथवा कर्मयेोग आमच्या समजुतीप्रमाणे शास्रीय क्रमानें मांडणी करून एवढा वेळपर्यंत विवेचन केले. आतां तेच विषय श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यामधील सभापणांत अर्जुनाचे प्रश्न किंवा शंका यांच्या अनुरोधानें कमीजास्त प्रमाणानें कसकसे आले आहेत हें सांगितलें म्हणजे हें विवेचन पूर्ण होऊन एकंदर विषयांचा पुढील प्रकरणांत उपसंहार करण्यास सोयीचे पडेल. 冷 आपला हिंदुस्थान देश ज्ञानाचे, वैभवाचे, यशाचे आणि पूर्ण स्वराज्याचे सुख अनुभवीत आहे अशी जेव्हां त्याची चोहीकडे ख्याति झाली होती, तेव्हां एका सर्वज्ञ महापराक्रमी, यशस्वी व परमपूज्य क्षत्रियानें दुस-या महान धनुर्धरास क्षात्रधर्मीच्या स्वकायसि प्रवृत्त करण्यासाठी गीता उपदेशिली आहे, हें वाचकानें प्रथम लक्षांत ठेविले पाहिजे. जैन व बौद्ध धर्माचे प्रवर्तक महावीर व गैौतमबुद्ध हे देाघेहि क्षात्रयच होते. तथापि दोघांनीहि वैदिक धमोतील फक्त सूंन्यासमार्गाचाच अंगीकार करून क्षत्रियादिक सवें वणोस ज्याप्रमाणे संन्यासधमाँचा दरवाजा मोकळा करून दिली, तुशी श्रीकृष्णाची गोष्ट नसून क्षात्रेयादिकांनीच काय पण ब्राह्मणांनीहि निध्रतिमागांतीलशांतीबरोबर निष्कामं बुद्धीनें सर्व कर्म आमरणान्त करण्याचा मार्ग स्वीकारिला पाहिजे, असा भागवतधर्माचा उपदेश आहे. परंतु कोणताहि उपदेश झाला तरी तो करण्यास कांही तरी कारण घडून यावें लागतें; आणि तो उपदेश सफल होण्यास शिष्याच्या मनांत सदर उपदेशाचे ज्ञान करून घेण्याची इच्छाहिं प्रथम जागृत झालेला असावी लागत्ये. म्हणून या दोन्ही गोष्टीचा खुलासा करण्यासाठीं गीतेच्या पहिल्या अध्यायांत श्रीकृष्णांनी अर्जुनास हा उपदेश करण्याचे काय कारण झालें, तें व्यासांनी सविस्तर वर्णिले आहे. कौरवपांडवांची सैन्यें लढाईस सज होऊन कुरुक्षेत्रावर उभी आहेत व आतां लढाईस तोंड लागणार, इतक्यांत अर्जुनाच्या सांगण्यावरून श्रीकृष्णाना त्याचा रथ दोन्ही सैन्यांचे मध्यभाग नेऊन उभा केला; आणि “तुला ज्यांबरोबर लढावयाचे आहे ते हे भीष्मद्रेणादिक पहा,” म्हणून त्यास सांगितले. तेव्हां अर्जुनानें दोन्ही सैन्यांकडे दृष्टिं फेंकल्यावर त्याच्या असें नजरेस आले की, आपलेच वडील, काके, आजे, माम, बंधु, पुत्र, नातू , स्नेही, आप्त, गुरु, गुरुबंधु वगैरे दोहोंकडे भरलेले असून या युद्धांत सर्वाचाचे नाश होणार ! लंढाई कांही एकदम उपस्थित झालेली नव्हती. लढाईचा निश्चय होऊन दोहों बाजूंनीं सैन्याची जुळवाजुळव बरेच दिवस चालली होती. तथापि परस्परांमधल्या या लढाईत होणाच्या कुलक्षयाचे प्रत्यक्ष स्वरूप प्रथम जेव्हां डोळ्यांपुढे आले, तेव्हां अर्जुनासारख्या महायोद्धयासहिं वाईट वाटून “ओरेरे ! आम्हांला राज्य मिळावें म्हणून आमच्या कुलाचाच हा भयंकर क्षय आम्ही करणार ना ? यापेक्षां भिक्षा मागितलेली काय वाईट?”असे त्याच्या तोंडून