पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

wく。 गीतारहस्य अथवा कर्मयोग त्मक बुद्धीची व नीतिशास्राची मीमांसा केली आहे. मनुष्य आपल्या किंवा पुष्कळांच्या सुखासाठींच जन्मला आह हें म्हणणें वरवर कितीहि मोहक दिसले तरी तें वस्तुतः खरं नाहीं, केवळ सत्याकरितां जीवदेण्यास जे महात्मे तयार होतात त्यांच्या मनांत पुढे येणाच्या पिढयांस अधिकाधिक विषयसुख व्हावें एवढाच हेतु असतो काय, याचा जर क्षणभर विचार केला तर आपल्या किंवा लोकांच्या अनित्य आधिभौतिक सुखापेक्षां अधिक महत्त्वाचे दुसरें कांहीं तरी या जगांत मनुष्याचे परमसाध्य असले पाहिजे असें म्हणणें भाग पडतें. हें साध्य कोणतें ? पिंडब्रह्मांडाच्या नामरूपात्मक अतएव नाशवंत पण दृश्य स्वरूपाखालीं आच्छादित झालेले आत्मस्वरूपी नित्यतत्त्व ज्यांनीं आत्मप्रतीतीनें जाणिलें आह त्यांचे या प्रश्नास असें उत्तर आहे कीं, आपल्या आत्म्याचे अमर, श्रेष्ठ, शुद्ध, नित्य व सर्वव्यापी स्वरूप ओळखून त्यात विराम पावणे हेंच ज्ञानवान् मनुष्याचे या नाशवंत जगांतील पहिलें कतैव्य होय. सर्वभूतान्तर्गत आत्मैक्याची याप्रमाणे ओळख होऊन हें ज्ञान ज्याच्या देहंद्रियांत मुरून गेलें तो पुरुष जग नश्वर आहे की नाही याचा विचार करीत न बसतां सर्वभूतहिताच्या उद्योगास आपोआपच प्रवृत्त होऊन सत्याचा पुरस्कर्ता बनतो. कारण, अविनाशी व त्रिकालाबाधित सत्य कोणतें तें त्थास पूर्णपणे कळलेले असते. मनुष्याची ही आध्यात्मिक पूर्णावस्थाच सर्व नीतीच्या नियमांचा मूळ झरा असून यालाच वेदान्तांत ‘मोक्ष' असे म्हणतात. कोणतीहि नीति घेतली तरी ती या अखेरच्या साध्यास सोडून असणे शक्य नाहीं; म्हणून नीतिशास्राचे किंवा कर्मयोगाचे विवेचन करितांना अखेर याच तत्त्वास शरण गेले पाहिजे. सर्वात्मैक्यरूप अव्यक्त मूलतत्त्वाचेच सर्वभूतहितेच्छा हें एक व्यक्त स्वरूप असून सगुण परमेश्वर आणि दृश्य सृष्टि ही देखील सर्वभूतान्तर्गत व सर्वव्यापी अव्यक्त आत्म्याचींच व्यक्त रूपें आहेत; आणि या व्यक्त स्वरूपांपलीकडे जाऊन अव्यक्त आत्म्याचे ज्ञान झाल्याखेरीज ज्ञानाची परिपूर्ति नाहीं इतकेंच नव्हे, तर देहांतील आत्म्याची पूर्णावस्था प्राप्त करून घेणें हें जें प्रत्येकाचे या जगांतील परम कर्तव्य तेंहि या ज्ञानाखेरीज सिद्ध होत नाही. नीति घ्या, व्यवहार घ्या, धर्म घ्या, किंवा दुसरें कोणतेंहि शास्र ध्या, “सर्व कर्माखिलं पार्थ झाने परिसमाप्यते”-अध्यात्मज्ञान हीच सर्वांची अखेरची गति आहे; आणि आमचा भक्तिमार्गहेि याच तत्त्वज्ञानास अनुसरून असल्यामुळे ज्ञानदृष्टया निष्पन्न होणारें साम्यबुद्धिरूपृ तत्त्वच, मोक्षाचे व सदाचरणाचे मूळ आहे, हा सिद्धान्त आमच्या भक्तिमार्गात सुद्धां कायम रहातो. ज्ञानप्राप्तीनंतर सर्व कर्माचा संन्यास केला पाहिजे अशी जी कांहीं वेदान्त्यांची समजूत आहे तेवढाच काय तो वेदान्तशास्रानें सिद्ध होणाच्या वरील तत्त्वावर महत्त्वाचा आक्षेप आहे. म्हणून झान व कर्म यांचा विरोध