पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* ভযানৰাৰ Y \,\9 देऊन नीतिमतेचा निकाल करावयाचा म्हटल्यास कर्मे करणाच्या पुरुषाच्या बुद्धीचा कांहींच विचार न होतां, एखाद्यानें आपल्या चोरीचे किंवा व्यभिचाराचे अनिष्ट बाह्य परिणाम होतील तितके कमी करण्याची आगाऊच कुटिल खबरदारी घेतली असल्यास त्याचे दुष्कृत्य आधिभौतिकनीतिदृष्टया त्या मानाने कमीा गर्ह होतें, असें म्हणण्याचा प्रसंग प्राप्त होतो. म्हणून केवळ वैदिक धर्मातच कायिक, वाचेिक व मानसिक शुद्धतेची अवश्यकता वर्णिली आह(मनु.१२.३-८; ९.२९) असें नाहीं; तर बायबलांतहि व्यभिचार हें पाप केवळ कायिक न मानितां, परस्रीकडे पुरुषांनी किवा परपुरुषाकडे स्त्रियांनी पहाणे, याची व्यभिचारांतच गणना केली आहे (माथ्यू ५.२८); आणि बौद्ध धर्मौत केवळ कायिक म्हणजे बाह्यच नव्हे तर त्याबरोबर वाचिक व मानसिक शुद्धताहेि जरूर असली पाहिजे असे म्हटलें आह (धम्म. ९६ व ३९१ पहा). शिवाय ग्रीन याचे आणखी असें म्हणणे आहे कीं, बाह्य सुख हेंच परमसाध्य मानिल्यानें मनुष्यामनुष्यांत व राष्ट्राराष्ट्रांत तें प्राप्त करून घेण्यासाठी चढाओढ लागून कलह उत्पन्न होण्याचा संभव असतो. कारण बाह्य सुख प्राप्त होण्यास लागणारी बाह्य साधनें प्रायः दुस-याचे सुख कमी केल्याखेरीज आपणांस प्राप्त हेोणें शक्य नसतें. साम्यबुद्धीची गोष्ट तशी नाही. हें अंतःसुख आत्मवश म्हणजे दुस-या कोणाहि मनुष्याच्या सुखाच्या आड न येतां ज्याचे त्यास प्राप्त करून घेतां येतें, इतकेंच नव्हे तर आत्मैक्य ओळखून सर्व भूतांशीं समतेनें वागण्याचा ज्याचा देहस्वभाव झाला त्याच्या हातून छपून किंवा उघड कोणतेंच दुष्कृत्य होण्याचा संभव रहात नसून, “पुष्कळांचे पुष्कळ सुख कशांत आहे हें नेहमी पहात जा” असेंहि त्यास सांगण्याची जरूर रहात नाही. कारण, मनुष्य म्हटला म्हणजे तो कोणतेंहि कृत्य सारासारविचार करूनच करणार हें अर्थातच प्राप्त आह. नैतिक कर्माच्या निर्णयार्थच फक्त सारासारविचार लागतो असें नाहीं. हा सारासारावचार करितांना अंत:करण कसें पाहिजे हाच महत्त्वाचा प्रश्न आहे: कारण, सवोचीं अंतःकरणें एकसारखीं नसतात. म्हणून अंतःकरणांत नेहमीं साम्यबुद्धि जागृत असली पाहिजे एवढे म्हटलें, म्हणजे पुष्कळ मनुष्यांच्याच काय, पण सर्व भूतांच्या किंवा प्राणिमात्राच्या हिंताचा सारासार विचार कर हें निराळे सागावें लागत नाही. मानव जातींतील प्राण्यांसंबंधानेंच नव्हे, तर मुक्या जनावरांसंबंधानेंहि मनुष्यांचीं कांहं कर्तव्यं असून त्यांचा कायोकार्थशास्रांत समावेश केला पाहिजे, असें पाश्चिमात्य पंडितहि आतां म्हणू लागले आहेत; व या व्यापक दृष्टीनें पाहिले तर “ पुष्कळ मनुष्यांचे पुष्कळ हित ’ यापेक्षां “ सर्वभूतहित ” हे शब्द अधिक व्यापक असून ‘साम्य बुद्धति’ या सर्वांचाच समावेश होतो, असें येईल. उलटपक्षीं, म्हणजे एखाद्याची बुद्धि शुद्ध व सम नाहीं असें मानिले तर,