पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहारः । Y چاوی असें गीतेंत सागितलें आह. सात्त्विक बुद्धीसच साम्यबुद्धि असेंहि नाव आहे; व त्यांतील ‘साम्य' या शब्दाचा ‘सर्वभूतान्तर्गत आत्म्याचे एकत्व किंवा साम्य ओळखणारी’ असा अर्थ आहे. जी बुद्धि हें साम्य ओळखीत नाहीं ती शुद्ध नव्हे व सात्त्विकहि नव्हे. नीतिनिर्णयाच्या कामीं साम्यबुद्धि याप्रमाणें श्रेष्ठ मानिल्यावर बुद्धीची ही समता किंवा साम्य कसें ओळखावें हा प्रश्न पुढे आपोआपच उत्पन्न होतो; कारण, बुद्धि हें अंतरिंद्रिय असल्यामुळे तें चांगले आहे का वाईट आहे हें डोळ्यांना दिसत नाही. यासाठीं बुद्धि सम व शुद्ध आहे किंवा नाही याची परीक्षा करण्यास प्रथम मनुष्याच्या बाह्य आचरणाकडे दृष्टि दिली पाहिजे; नाहीपेक्षां माझी बुद्धि चांगली आहे असें तोंडानें म्हणून कोणीहि मंनुष्य हवें तें करू लागेल. म्हणून खरा ब्रह्मज्ञानी पुरुष त्याच्या स्वभावावरून ओळखावा लागतो, नुस्ता बोलका असेल तर तो खरा साधु नव्हे, असा शास्रांत सिद्धान्त केला असून, स्थितप्रज्ञांचीं व भगवद्भक्तांचीं लक्षणे सांगतांना सदर पुरुष जगांत इतर लोकांशी कसे वागतात याचेच मुख्यत्वेंकरून भगवद्गीतंत वर्णन केले आहे; आणि तेराव्या अध्यायांत ज्ञानाची व्याख्याहि त्याच प्रकारची म्हणजे ज्ञानाचा स्वभावावर काय परिणाम घडतो हें सागून केली आहे. बाह्यकमीकडे मुळींच लक्ष देऊं नका, असें गीतेचे म्हणणें नाही हें यावरून स्पष्ट दिसून येईल. पण एखाद्याची,-विशेषतः परक्याची,-बुद्धि सम आह की नाही याची परीक्षा करण्यास त्याचे बाह्य कर्म म्हणजे वर्तन,-आणि त्यांतलें त्यांतहि संकटकालचे वर्तन,-हेंच जरी मुख्य साधन आहे, तरी केवळ या बाह्य वर्तनावरूनच नीतिमतेची बिनचूक परीक्षा होऊं शकत नाहीं हें पुनः लक्षांत ठेविले पाहिजे. कारण, प्रसंगविशेषी बाह्य कर्म लहान असले तरी त्याची नैतिक किंमत मोठया कर्माइतकीच असत्ये, हें नकुलोपाख्यानावरून सिद्ध होतें. म्हणून बाह्य कर्म लहान असो वा मोठे असो, एकाला सुख देणारें असो वा अनेकांच्या अत्यंत सुखाचे असो, शुद्ध बुद्धीचा पुरावा यापेक्षां त्यास जास्त महत्त्व न देतां, या बाह्य कर्मावरून कत्र्याची बुद्धि किती शुद्ध आहे तें प्रथम ठरवून, अशा रीतीनें व्यक्त होणा-या शुद्ध बुद्धीवरून अखेर सदर कर्माच्या नीतिमतेचा निर्णय करावा लागतेो, नुस्त्या बाह्य कर्मावरून नीतिमतेचा योग्य निर्णय होत नाहीं, असें आमच्या शास्रकारांनी ठरावले आहे; आणि याचमुळे कर्मापेक्षां बुद्धि श्रेष्ठ (गा.२.४९), असे गीतेच्या कर्मयोगांत सम व शुद्ध युद्धीस म्हणजे वासनेसच प्राधान्य दिले आहे. नारदपंचरात्र नांवाचा भागवतधमोचा जो एक गीतेहून अवचिीन ग्रंथ आहे त्यांत मार्कडेय नारदास असें सांगतात कीं मानसं प्राणिनामेध सर्वकूर्मककारणम। मनेानुरूपं बाषयं च वधि्रयन प्रस्फुटं मनः ॥