पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंझारः Y \o 5 वर म्हणजे संपत्कालीं केलेल्या एका अश्वमेधानेंच नव्हे तर तत्पूर्वी म्हणजे आपत्कालच्या अनेक अडचणींच्या प्रसंगीं ब्राह्मणाप्रमाणेच युधिष्ठिराच्या शुद्ध बुद्धीची पूर्ण परीक्षा झालेली होती; म्हणून धर्माधर्मनिर्णयाच्या वरील सूक्ष्म न्यायानेंहि युधिष्ठिर धार्मिकच ठरतो असा मेहाभारतकारांचा सिद्धान्त असल्यामुळे, त्यांनीं पुंगुसाला निदक म्हटले आहे. तथापि अश्वमेध करणारांना जी गति मिळावयाची तीच ब्राह्मणासहि मिळाली असें जें वर्णन आहे त्या वर्णनावरून ब्राह्मणाच्या कर्माची योग्यता युधिष्ठिराच्या यज्ञापेक्षां अधिक नसली, तरी निदानपक्षीं दोहींची नैतिक व धार्मिक किंमत महाभारतकार एकच समजतात हें निर्विवाद आहे. व्यवहारांतहि याच न्यायानें एखाद्या लाखोपर्तानें एखाद्या धर्मकृत्यास हजार रुपये आणि गर्राबानें एक रुपया वर्गणी दिल्यास आपण त्या दोहोंची नैतिक किंमत एकच समजतों. वर्गणी या शब्दावरून हा दृष्टान्त कोणास नवा वाटण्याचा संभव आहे; म्हणून सांगतों कीं, मुंगुसाची कथा चालू असतां महाभारतांत धर्माधर्माचें जें विवेचेन केले आहे त्यांतच सङ्घस्रशाक्तिश्च दातं शातद्ाक्तिर्दशापि च । दद्यादपश्च यः दात्तया सर्वे तुल्यफलाः स्मृताः । ‘‘हजारवाल्यानें शंभर, शंभरवाल्यानें दहा, किंवा कोणी यथाशक्ति थोडें पाणीहि दिल्यास ते सर्व तुल्यफल म्हणजे सारख्याच योग्यतेचे आहेत”-मभा.अश्व.९०. ९७) असां श्लोक असून, “पत्रं पुष्पं फलं तोयं०” (गी.९.२६) या गीतावाक्याचे तात्पर्यहि तेंच आहे. आमच्याच धर्मात नव्हे तर ख्रिस्ती धर्मातहि या तत्त्वाचा संग्रह केलेला आहे. “ज्याला पुष्कळ दिले आहे त्यापासून पुष्कळाची अपेक्षा करितात” (ल्यूक,१२.४८) असें ख्रिस्तानें एके ठिकाणी म्हटलें असून, एके दिवशीं तो देवळांत गेला असतां त्या ठिकाणीं धर्मार्थ पैसे गोळा करण्याचे काम सुरू झाल्यावरतेथे असलेल्या एका अत्यंत गरीब विधवेनें आपल्याजवळ असलेले दोन्ही पैसे धर्मार्थ दिलेलेपाहून “या बाईनें इतर सर्वापेक्षां अधिक धर्म केला,” असे ख्रिस्ताच्या तोंडून उद्गार निघाल्याचे बायबलांत दुस-या ठिकाणीं वर्णन आहे (मार्क.१२.४३व ४४).कर्माची योग्यता कत्र्याच्या बुद्धीवरून ठरवावी लागत्ये, कत्यांची बुद्धिशुद्ध असली, म्हणजे लहान कर्महि कित्येकंदां मोठ्या कर्माची नैतिक योग्यता पावत ही गोष्ट ख्रिस्तालाहि मान्य होती असें यावरून उघड होतें. उलटपक्षों म्हणजे बुद्धि शुद्ध नसतां कर्माच्या नैतिक किंमतीवर त्याचा काय परिणाम घडतेा याचा विचार केला तर असे आढळून येतें कीं,हृत्त्या करणें हें कभै एकंच; पण आपल्या अंगावर चालून आलेल्यास स्वसंरक्षणार्थमारणें,व एखाद्या श्रीर्मत वाटसंरूंचा द्रव्यासाठीं वाटेंत खून करणे, या दोन गोष्टी नैतिकदृष्टया अत्यंत भिन्न आहेत. जर्मन i