पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* * ভযৱস্থাৰ ४६९ वद, धर्म चर, हीं विधानें या प्रकारचीं होत. मन्वादि स्मृतींतून व उपनिषदांतून हे विधि, आज्ञा किंवा आचार स्पष्टपणे नमूद केलेले आहेत. पण मनुष्य हा ज्ञानवान प्राणी असल्यामुळे वरच्यासारख्या नुस्त्या विधानांनीं त्याचे समाधान न होतां, हे नियम घालून देण्याचे कारण काय हें समजून घेण्याची त्याला स्वभावत:च इच्छा होत्ये; आणि मग विचार करतां करतां या नियमांतील नित्य व मूळचे तत्त्व काय हें शोधून काढीत असतो. व्यावहारिक धर्माचा याप्रमाणे अंत पाहून त्यांतील मूलतत्त्वें शोधून काढणे हें शास्राचे काम असून सदर विषयाचे नुस्ते नियम एकत्र करून सांगणे यास आचारसंग्रह असे म्हणतात. कर्ममार्गाचा आचारसंग्रह स्मृतिग्रंथांत आहे, आणि भगवद्गीतेंत त्या आचाराचीं मूलतत्त्वें काय याचे संवादात्मक किंवा पौराणिक पद्धतीचे पण शास्रीय म्हणजे तात्त्विक विवेचन आहे. म्हणून भगवद्गीतंतील प्रतिपाद्य विषयास नुस्तें कर्मयोग असें म्हणण्यापेक्षां कर्मयोगशास्र असे म्हणणें अधिक प्रशस्त होय; आणि हाच शब्द म्हणजे योगशास्र भगवद्गीतेच्या अध्यायपरिसमाप्तिसूचक संकल्पांत आलेला आहे. गीतेंतील या कर्मयोगशास्रासच पारलौकिक दृष्टि सोडून देणारे किंवा गौण मानणारे पाश्चिमात्य पंडित सद्वर्तनशास्र, सदाचारशास्र, नीतिशास्र, नीतिमीमांसा, नीतिशास्राचीं मूलतत्त्वें, कर्तव्यशास्र, कार्याकार्यव्यवस्थिति, किंवा समाजधारणाशास्र, अशीं निरनिराळीं केवळ लौकिक नांवें देत असतात; व नीतिमीमांसेची त्यांची पद्धतहि लौकिकच असत्ये. यामुळे असल्या पाश्चात्य पंडितांचे ग्रंथ ज्यांनीं वाचिले आहत त्यांपैकीं पुष्कळांची अशी समजूत होत्ये कं संस्कृत वाङ्मयांत सदाचरणाच्या किंवा नीतीच्या मूलतत्त्वांचा कोणीहि ऊहापोह केलेला नाहीं. आमच्याकडील गहन तत्त्वज्ञान म्हटलें म्हणजेवदान्त; आणि सध्यांचे आमचेवेदान्तग्रंथ पहावे तर सांसारिक कमांबद्दल ते प्रायः उदासीन असतात असे आढळून येते. मग कर्मयोगशास्राचा किंवा नीतीचा विचार कोठे सांपडणार ४ व्याकरण किंवा न्याय यांवरील ग्रंथांत हा विचारयेणे शक्य नाहीं; आणि स्मृतिग्रंथात धर्माज्ञेच्या संग्रहापलीकडे कांहीं जास्त मिळत नाही. तेव्हां आमचे प्राचीन शास्रकार मोक्षाच्या गहन विचारांत गढून गेल्यामुळे सदाचरणाच्या किंवा नीतीधर्माच्या मूलतत्त्वांचे विवेचन करण्यास विसरले, अशी ब-याच लोकांची समजूत झालेली आहे. महाभारताचा किंवा गीतेचा लक्षुपूर्वक अभ्यास केल्यास ही संमजूत दूर होण्यासंारखी आहे. पण महाभारत आतिविस्तीर्ण असल्यामुळे तें सबंध वाचून त्यांतील विषयांचे मनन करण्यास अवघड; आणि गीता लहान असली तरी सांप्रदायिक टीकाकारांच्या अभिप्रायाप्रमाणें तीस केवळ मोक्षप्रासीचेंच ज्ञान साशितलेले आहे अशौं दृढ समजूत झालेली.परंतु कौणॉअसै ध्यानांत आणना कीं सन्यास आणि