पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १९ वें उपसंह्रार. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । % शीता ८. ७. गीतेतील अध्यायांची संगतेि पहा, किंवा त्यांतील विषयांचे मीमांसकांच्या पद्वतीनें पृथक् पृथक् विवेचन करा, कोणत्याहि बाजूनें पाहिले तरी सांप्रदायिक टीकाकारांनी कर्मयोग गौण ठरवून अनेक प्रकारं गीतेंचीं जीं तात्पर्यं वर्णिली आहत ती यथार्थ नसून उपनिषदांतील अद्वैत वेदान्ताची भक्तीशी जोड घालून तद्द्वारा थेोर व कत्य पुरुषांच्या आयुष्यक्रमाची उपपात लावणे, किवा थोडक्यांत सांगावयाचे असल्यास “ज्ञानभक्तियुक्त कर्मयोग,” हंच गीतेचे खरें तात्पर्य आह असें सिद्ध होतें. मीमांसक म्हणतात त्याप्रमाणें नुस्ती श्रौतस्मार्त कर्मच सदैव करीत रहाणें जरी शास्रोक्त असले, तरी ज्ञानाशवाय होणाच्या असल्या तांत्रिक क्रियेनें बुद्धिमान् मनुष्याचे समाधान होत नाही; आणि उपनिषदांतील धर्म पहावा तर तो केवळ ज्ञानमय असल्यामुळे अल्पबुद्धि लोकांस त्याचे आकलन होणें कठिण असून शिवाय त्यांतील संन्यासमार्गहि लोकसंग्रहास विरुद्ध पडतो. म्हणून बुद्धि (ज्ञान), प्रेम (भक्ति) व कृर्तृत्व या सर्वाचा योग्य मेळ बसून मोक्षाला अंतर नं पडतां ज्यानें लोकव्यवहारहि सुरळीत चालेल असा ज्ञानमूलक, भक्तिप्रधान व आमरणान्त निष्काम कर्मपर धर्म भगवंतांनी गीतेंत उपदेशिला आहे; व यांतच कर्माकर्मशास्राचा सर्व इत्यर्थ आलेला आह, किबहुना हा धर्म अर्जुनास उपदेशण्यास कमीकर्माचे विवेचन हेंच मूळ कारण झाले आहे, असें गीतेच्या उपक्रमोपर्सहारांवरून उघड होतें. कोणतं कर्म धम्यै, पुण्यप्रद, न्याय्य किंवा श्रेयस्कर, आणि कोणतें त्या उलट म्हणजे अधम्यै, पापप्रद, अन्याय्य किवा गह्य हें दोन प्रकारें सांगतां येतें. पहिला प्रकार म्हटला म्हणजे त्याची उपपाते किवा मर्म न सांगतां अमुक गोष्ट अमक्या रीतीनें केली तर शुद्ध, आणि तमक्या रीतीनें केली तर अशुद्ध असें नुस्तें विधान करणें हें होय. हिंसा करूं नको, चेोरी करूं नको, सत्यं

  • “ म्हणून सर्व कालीं माझे स्मरण कर आणि लढ.” लढ हुा शब्द प्रसंगानुसार ोईल याचाग छत्ता लढ एवढाच नसून यथाधिकार कर्मकरें"असो