पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ ६ ४ गीतारहस्य अथवा कर्मयोग या सिद्धांताबद्दल शाब्दिक मतभेद असला तरी तत्त्वतः मतभेद नाहीं. निदान गीताशास्रास तरी हा सिद्धान्त सर्वथैव प्राह्य आह. तसेंच अर्थ व काम हे दोन पुरुषार्थ संपादन करावयाचे असल्यास तेहि नीतिधर्मानेंच केले पाहिजेतू हें तत्त्व सुद्धां गीतेस पूर्णपणें मान्य आहे. आतां धर्म (म्हणजे व्यावहारिक चातुर्वण्यधर्म) आणि मोक्ष यांचा परस्पर संबंध काय एवढ्याचाच निर्णय करणें शिल्लक उरलें. पैकीं प्रथम धर्मानें चित्तशुद्धि झाल्याखेरीज मोक्षाची गोष्टच बालावयास नको ही सिद्धान्त सर्व पक्षांस मान्य आहे. ही चित्तशुद्धि होण्यास बराच काल लागतो. म्हणून मोक्षदृष्टया विचार केला तरीहि तत्पूर्वीच्या कालांत ‘धर्मानें' संसार आधीं पुरा करून घेतला प्राहिजे असेंच सिद्ध होनें (मनु.६:३५-३७). संन्यास म्हणजे सैोडणे; आणि धर्मानें ज्याला प्रपंच सिद्ध झाला नाही, तो सोडणार तरी काय ? अथवा ज्याला प्रपंच नीट साधत नाहीं ‘त्या करंटयाला’ परमाथै तरी नीट कसी साधणार (दास.१२.१.१-१०वृ१२.८.२१-३१ पहा) / कारणु, साध्य प्रापंचिकू असो वा पेारमार्थिक असो, तँ सिद्ध होण्यास दीर्घप्रयत्न, मनोनिप्रह व सामथ्र्य इत्थादि गुणांची सारखीच अपेक्षा असयेः आणि हे गुण ज्याच्या अंगांत नाहीत त्याला कोणतेंच साध्य प्राप्त होणार नाही हें उघड अहि. पण हें कबूल करून यापुढे कित्येकांचे असे म्हणणें अहिकुं, दीर्घप्रयूत्नानें व मनोनिग्रहानें आत्मज्ञान झाल्यावर शेवटी जगांतील विषयेोपभोगरूपी सर्व व्यवहार नि:सार वाटतात; आणि सर्प आपली निरुपयोगी झालेली कात ज्याप्रमाणे टाकून देतो तद्वत् शानी पुरुष सवै ऐहिकविषय सोडून केवळ परमेश्वरस्वरूपींच लीन होऊन रहात असतात (बृ.४.४. ७). आयुष्यक्रमृणाच्या या मूर्गात अखेरव्यवहारसोडून केवळ ज्ञानालाच प्राधान्य दिंले असल्यामुळे त्यास ज्ञाननिष्ठा, सांख्यनिष्ठा,किंवा सर्व व्यवहाराचा त्यागकेल्या मुळे संन्यासर्निष्टा असे म्हणतात.पण याच्या उलट गीताशाखाचे असे म्हणणे आहे कॅी,पहिल्यानें चित्तशुद्धीसाठी‘धर्म'पाहिजे इतकेंच नव्हे, तर्पुढें चित्तशु६ झाल्यावर स्वत:करितांजरी विषयोपभोगरूपी व्यवहार तुच्छ झाले तरी लोकसंग्रहार्थ तेच व्यवहारकेवळ स्वधर्म किंवा कर्तव्य म्हणून निष्काम बुद्धीनें करणें जरूर आहे. ज्ञानी पुरुष याप्रमाणे न करीलतर लोकांना किता घालूनदेणारा कोणीच न राहून जगाचा नाश होईल. या कर्मभूमीत कर्म कोणालाच सुटत नाही; व बुद्धि निष्काम झालेली असलैा म्हणजे जें कर्म करावें तें मोक्षाच्या आड येऊं शकत नाही. म्हणून संसार न सोडितां इतरांप्रमाणे जगांतील सर्व व्यवहार विरक्त बुद्धीनें आमरणान्त करणे हे ज्ञानी पुरुषाचेहि कर्तव्य बनतें. आयुष्यक्रमणाच्या गीतेंत उपदेशिलेल्या या मार्गासच कर्मनिष्ठा किंवा कर्मयोग असें म्हटले आह. परंतु कर्मयोग याप्रमाणे श्रेष्ठ ठरावला तरी त्यासाठी गीतेंत संन्यासमागौची कोठेहि निंदा केलेली