पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४fीताध्यायसंगति ४ ६ ३ आहे तरी मीमांसकांच्या ग्रंथपरीक्षणाच्या सर्व कसोट्या तिला लावून गीतेंचे तात्पर्य ठरविण्यास तिनें कांहीं अडचण पडत नाहीं हें या ग्रंथांतील एकंदर विवेचनावरून कळून येईल. गीतेचा प्रारंभ पाहिला तर क्षात्रधर्माप्रमाणें लढाई करण्यास निघालेला अर्जुन धर्माधर्मविचिकित्सच्या बुचकळ्यांत पडल्यावर त्यालावेदान्तशास्त्राच्या आधारें प्रवृत्तिपर कर्मयोगधर्माचा उपदेश करण्यासाठीं गीता प्रवृत्त झाली आहे असें उघड नजरेस येतें; आणि गीतेचा उपसंहार व फळ हीं दोन्ही त्याच प्रकारचीं म्हणजे प्रवृत्तिपर आहेत असें पहिल्याच प्रकरणात आम्ही दाखविलें अहेि. यानंतर गीतंत अर्जुनाला जो उपदेश केला त्यांत “तूं युद्ध किंवा कर्मच कर” असें स्पष्टपणें दहाबारादां व पर्यायानें पुष्कळदांच (अभ्यास) सांगितलें असून, संस्कृत वाङ्मयांत कर्मयोगाची उपपति सांगणारा गीतेखेरीज दुसूरा ग्रंथ नसल्यामुळे, अभ्यांस आणि अपूर्वता या दोन प्रमाणांनी गतेिची कर्मयोगपरताच कशी अधिक व्यक्त होत्ये तें सांगितलें. मीमांसकांनी ग्रंथतात्पर्यनिर्णयार्थ ज्या कसोट्या सागितल्या आहेत त्यांपैकी अर्थवाद व उपपत्ति या दोन शिल्लक राहिल्या होत्या. त्यांबद्दलप्रथम प्रकरणशः पृथक्पृथक् आणि आतां गीतेंतील अध्यायक्रमाप्रमाणें या प्रकरणांत जो विचार केला त्यावरून ‘कर्मयोग’ हाच गीतंतील प्रतिपाद्य विषय आहे असें निष्पन्न झालें. एतावता मीमांसकांचे ग्रंथतात्पर्यनिर्णयाचे सर्व नियम लावून पाहिले तरी गीताग्रंथांत ज्ञानमूलक व भक्तिप्रधान कर्मयोगच प्रतिपाद्य आहे, असें निर्विवाद सिद्ध होतें. याखेरीज बाकीची गीतातात्पर्य साप्रदाTयक होत याबद्दल शंका नाहीं. पण हीं तात्पर्ये जरी सांप्रदायिकदृष्ट्या काढलेलीं असली तरी गीतेचे हे सांप्रदायेिक अर्थ-विशेषतः संन्यासपर अर्थ-लावण्यास सवड कशी मिळाली हें दाखविल्याखेरीज या सांप्रदायिक अर्थाची चर्चा पुरी होत नाहीं. म्हणून या सांप्रदायेिक टीकाकारांस गीतेचा संन्यासपर अर्थ कसा करितां आला याचा आतां थोडा विचार करून हें प्रकरण संपवितों. मनुष्य हा बुद्धिमान् प्राणी असल्यामुळे पिंडव्रह्मांडांतील तत्त्व ओळखिणें हेंच त्याचे मुख्य काम किंवा पुरुषार्थ आहे, असा आमच्या शास्रकारांचा सिद्धान्त आहे; व यासच धर्मशास्रांत ‘मोक्ष' असें म्हणतात. तथापि दृश्य सृष्टीच्या व्यवहाराकडे नजर देऊन, हा पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असा चतुर्विध आह असें शास्रांतूनच प्रतिपादन केले आहे. ‘धर्म’ शब्दानें या ठिकाणीं व्यावहारिक, सामाजिक व नैतिक धर्म समजावयाचा, हें पूर्वीच सांगितले आहे. पुरुषार्थ याप्रमाणे चतुर्विध मानिल्यावर त्याचीं चारी अंगें परस्परांचीं पोषक आहत किंवा नाहींत हा प्रश्न आपोआपच उत्पन्न होतो. पैकीं पिंडों व ब्रह्मांडीं जें तत्त्व आहे त्याचे ज्ञान झाल्याशिवाय मोक्ष नाहीं, मग तें ज्ञान कोणत्याहि मार्गानें प्राप्त होवो,