पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ィー 。 गीतारइस्य अथवा कर्मयोग या जगांत कृतकृत्य होऊन अखेर त्याला शांति व मोक्ष मिळतात, असें सांगितलें आहे, आणि कर्म हा प्रकृतीचा धर्म असल्यामुळे तीं सोडूं म्हटले तरीहि सुटत नाहींत, म्हणून सर्व कर्ता व करविता परमेश्वरच आहे अशा बुद्धीनें त्याला शरण जाऊन, सर्व कर्मे निष्काम बुद्धीनें करीत जा, मीच तो परमेश्वर आहें, माझ्यावर विश्वास ठेवून मला भज, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, असा अर्जुनास भक्तिमार्गाचा निश्चित उपदेश करून भगवंतांनीं गीर्तेतील प्रवृत्तिपर धर्माच्या निरूपणाची समाप्ति केली आहे. सारांश, इहलोक आणि परलोक या दोहोंचाहि विचार करून ज्ञानवान् शिष्टांनीं प्रचारांत आणिलेल्या ‘सांख्य’ व ‘कर्मयोग’ अशा ज्या दोन निष्ठा त्यांच्यापासून गीतेंतील उपदेशास सुरुवात झालेली असून, त्यांपैकीं ज्या कर्मयोगाची मातब्बरी अधिक असा पांचव्या अध्यायांत निर्णय केला व ज्या कर्मयोगाच्या सिद्धयथै सहाव्यांन पातंजल योगाचे वर्णन करून, जो कर्मयोग आचरीत असतां त्यांतच परमेश्वराचे पूर्ण ज्ञान होऊन अखेर मोक्ष कसा मिळतो या विधीचे पुढील अकरा अध्यायांत पिंडब्रह्मांड-ज्ञानपूर्वक सविस्तर निरूपण केलें, त्याच कर्मयोगानें अठरावे अध्यायांत म्हणजे शेवटीहिं समर्थन आहे; आणि मोक्षरूपी आत्मकल्याणाच्या आड न येतां परमेश्वरार्पणपूर्वक केवळ कर्तव्यबुद्धीनें स्वधमीप्रमाणें लोकसंग्रहार्थ सर्व कमें करीत रहाण्याचा जो हा योग किंवा युक्ति तिच्या श्रेष्ठत्वाचे हें भगवत्प्रणीत उपपादन जेव्हां अर्जुनानें ऐकिलें, तेव्हांच संन्यास घेऊन भिक्षा मागण्याचा मनांत आलेला विचार सोडून देऊन-केवळ भगवान् सांगतात म्हणून नव्हे,तर कमीकर्मशास्राचे पूर्ण ज्ञान झाल्यामुळे-तो स्वेच्छेनें युद्ध करण्यास प्रवृत्त झाला आहे. अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्यासाठींच गीता सांगण्यास सुरुवात झाली व गीतेचा शेवटहि तसाच झाला आहे (गी. १८.७३). गीतेच्या अठरा अध्यायांची वर जी संगतेि सांगितली त्यावरून गीता म्हणजे कर्म, भाक्त व ज्ञान या तीन स्वतंत्र निष्ठांची खिचडी, किंवा कापूस, रेशीम व जर यांच्या चिंध्या शिवून तयार केलेली गोधडी नसून, कापूस, रेशीम व जर यांचे निरनिराळे धागे यथास्थानीं योग्य रीतीनें बसवून दिल्यावर कर्मयोग नांवाचे मौल्यवान् व मनोहर असें हेंगीतारूपी सणग अव्वलपासून अखेरपर्यंत ‘अत्यंत योगयुक्तचित्तानें' सलग विणलेले आहे, असें दिसून येईल. निरूपणाची पद्धति संवादात्मक असल्यामुळे शास्रीय पद्धतीपेक्षां ती थोडी ढिली आहे खरी; संवादात्मक निरूपणानें शास्रीय पद्धतीची रूक्षता जाऊन त्याऐवजीं गीतेंत जें सौलभ्य व प्रेमळपणा भरला गेला आहे, तो लक्षांत आणिला म्हणजे शास्रीय पद्धतीतील हेत्वनुमानांची केवळ बुद्धिप्राह्य नीरस छक्कड सुटल्याचे कोणासहि काडीभर देखील वाईट वाटणार नाहीं. तसेंच गीतानिरूपणाची पद्धत जरी पौरााणक किंवा संवादात्मक