पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीताध्यायसंगति و به لا हें कर्ममार्गाचे प्रधान तत्त्व मध्यें मध्ये सांगण्यास भगवान् विसरत नाहींत. उदाहरणार्थ, “तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धय च”-म्हणून सर्व वेळ माझें स्मरण मनांत ठेव आणि युद्ध कर-असें आठव्या अध्यायांत (८.७), तर “सर्व कर्म मला अर्पण केल्यानें कर्माच्या शुभाशुभ फलापासून तूं मुक्त होशील" असें नवव्या अध्यायांत (९.२७,२८) म्हटलें आह. सर्व जग हें माझ्यापासून झालेलें व माझेंच रूप होय असें जें वर सांगितलें तेंच दहाव्या अध्यायांत जगांतील प्रत्येक श्रेष्ट वस्तु माझीच विभूति आहे असें अनेक उदाहरणें देऊन अर्जुनास समजून दिल्यावर अर्जुनाच्या प्रार्थनेवरून अकराव्या अध्यायांत त्यास आपले विश्वरूप प्रत्यक्ष दाखवून मीच परमेश्वर चीहींकडे भरलेला आहं या गोष्टींची सत्यता भगवंतांनी अर्जुनाच्या डोळ्यांपुढे मांडून अनुभवास आणून दिली आहे. पण याप्रमाणें विश्वरूप दाखवून सर्व कर्मे करविता मीच आहें अशी अर्जुनाची खातरी केल्यावर लागलीच “खरा कर्ता मी व तूं निमित्त आहेस, म्हणून निःशंक होऊन युद्ध कर,” असें भगवंतांनी म्हटलें आहे (गी.११ ३३). सर्व जगांत एकच परमेश्वर आहे असें जरं याप्रमाणें सिद्ध झाले तरी “अव्यक्त असतां मला मूर्ख लोक व्यक्त समजतात” (७.२४), “यदक्षरं वेदविदो वदति” (८.११)-ज्याला वेदवेते अक्षर म्हणतात, ‘‘अव्यक्तालाच अक्षर म्हणतात” (८.२१), “माझें खरें स्वरूप न जाणतां मी मनुष्यदहृधारी आहें असें मूढ लोक मानितात” (९.११), “विद्येमध्यें अध्यात्मविद्या श्वेष्ट”(१०.३२), आणि अर्जुनानें म्हटल्याप्रमाणे“त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्” (११.३७), याप्रमाणें जागोजाग परमेश्वराचें अव्यक्त स्वरूपच मुख्य अशीं वर्णनें आली असल्यामुळे परमेश्वराची उपासना करणें ती व्यक्ताची करावी की अव्यक्ताची करावी असा बाराव्या अध्यायाचे आरंभीं अर्जुनाचा प्रश्न आहे. तेव्हां नवव्या अध्यायांत वर्णिलेली व्यक्त स्वरूपाची उपासना सुलभ असें आपले मत सांगून दुसच्या अध्यायांत स्थितप्रज्ञाचें जसं वर्णन आहे त्याप्रमाणे परभ भगवद्भक्ताच्या स्थितीचे वर्णन करून हा अध्याय समाप्त केला आहे. कर्म, भात व ज्ञान असे गीतेचे तीन स्वतंत्र तुकडे जरी करितां आले नाहीत तरी सातव्या अध्यायापासून सुरू झालेल्या ज्ञानविज्ञानाचे भाक्त व ज्ञान असे दोन पृथक् विभाग सहज होतात असें कित्येकांचे मत असून, द्वितीय षडध्यायी भाक्तैपर आहे असें ते म्हणत असतात. परंतु हं मत सुद्धां खरें नाही, असें थोडथा विचारान्तीं कोणाच्याहि लक्षांत येईल. कारण,सातव्या अध्यायाची सुरुवात क्षराक्षर सृष्टीच्या ज्ञानविज्ञानापासून आह, भक्तीपासून नाही; आणि भक्तीचे वर्णन जर बाराव्या अध्यायांत संपले म्हणावें,तर पुढील अध्यायांतून जागोजाग बुद्धीनें ज्यांस माझें स्वरूप कळत नाहीं त्यांनीं श्रद्धेनें “दुसच्याच्या वचनावर विश्वास ठेवून माझें