पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४५६ गीतारहस्य अथवा कमैयोग स्थिर, सम व आत्मनिष्ठ होण्यास परमेश्वराची जी उपासना करावयाची ती अव्यक्ताची करणें बरं का व्यक्ताची करणें बरें, याचाहि आतां निर्णय करावा लागतो; आणि त्याबरोबरच परमेश्वर एक असतां व्यक्त सृष्टीत जें नानात्व आढळून येतें त्याचीहि उपपत्ति सांगावी लागत्ये. हे सर्व विषय व्यवस्थित रीतीनें सांगण्यास अकरा अध्याय लागले यांत कांहीं आश्चर्य नाही. गीतेंत भक्ति व ज्ञान यांचें बिलकुल विवेचन नाहीं असें आम्ही म्हणत नाही. आमचे एवढेच सांगणे आहे की, कर्म, भक्ति व ज्ञान हे तिन्ही विषय किंवा निष्ठा स्वतंत्र म्हणजे तुल्यवल कल्पून गीतेच्या अठरा अध्यायांची भाऊबंदकीप्रमाणे या तिघांत जी सारखी वांटणी करितात तसें करणे युक्त नसून, ज्ञानमूलक व भक्तिप्रधान कर्मयेोग ही एकच निष्ठा सर्व गतेिंत प्रतिपाद्य होय: आणि सांख्यनिष्टा, ज्ञानविज्ञान किवा भक्ति यांचे जें निरूपण भगवद्गीतेंत आलेलें आह तें एक कर्मयोगनिछेच्या पूत्थैर्थ किवा समर्थनार्थ अनुषंगानें आलेले आह, स्वतंत्र विषय प्रतिपादन करण्यासाठीं नाही. आतां या सिद्धान्ताप्रमाणे कर्मयोगाच्या पारंपूत्र्यर्थ व समर्थनार्थ सांगितलेल्या ज्ञानविज्ञानाची अध्यायवार कशी वांटणी केली आहे तें पाहूं. सातव्या अध्यायांत क्षराक्षर सृष्टीच्या म्हणजे ब्रह्मांडाच्या विचारास आरंभ करून ही सर्व सृष्टेि-पुरुष आणि प्रकृति-माझींच परापर स्वरूपें असून या मायेच्या पलीकडलें अव्यक्त रूप ओळरवून जें मला भजतात त्यांची बुद्धि सम होऊन त्यांना मा सद्गति देतों, असे अव्यक्त किंवा अक्षर परब्रह्माचे ज्ञान प्रथम भगवंतांनी सांगितले असून, सगळ्या देवता, सगळी भूतें, सगळे यज्ञ, सगळे कर्म, सगळे अध्यात्म मीच आहं, माझ्याखेरीज या जगांत दुसरें कांहीं नाहीं, असें आपल्या स्वरूपाचे वर्णन केले आहे. नंतर आठव्या अध्यायांत आरंभी अध्यात्म, अधियज्ञ, अधिदैव व अधिभूत म्हणजे काय याचा अर्थ मला सांगा असा अर्जुनानें प्रश्न केल्यामुळे या शब्दांचे अर्थ सांगून याप्रमाणें माझें स्वरूप ज्यानें ओळखिलें त्याला मी विसरत नाही असें वर्णन केल्यावर, सर्व जगांत अविनाशी किंवा अक्षर तत्त्व कोणतें, सर्व जगाचा संहार केव्हां व कसा होती, आणि परमेश्वरस्वरूपाचें ज्ञान झालेल्या पुरुषास कोणती गति प्राप्त होत्ये व ज्ञानाशिवाय नुस्तां काम्य कर्म करणा-यास कोणती गति मिळत्ये याचे संक्षेपानें विवेचन आहे. नवव्या अध्यायांतहि तोच विषय चालू ठेवून चोहींकडे याप्रमाणें भरून राहिलेल्या अव्यक्त परमेश्वराच्या व्यक्त स्वरूपाची भक्तीनें ओळख करून घेऊन अनन्यभावानें त्याला शरण जाणे हाच ब्रह्मप्राप्तीचा प्रत्यक्षावगम्य सुलभ मार्गे किंवा राजमार्ग होय, आणि राजविद्या किंवा राजगुह्य यालाच म्हणतात, असा उपदेश आहे. तथापि या तिन्ही अध्यायांत ज्ञानवान् किंवा भाक्तमान् पुरुषानें कमें करीत राहिले पाहिजे