पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१ वरील दोन पुस्तकें यथावकाश प्रसिद्ध होऊन त्यांचा जगभर बोलबाला झाला, पण गीतारहस्य ग्रंथाच्या लेखनाला मुहूर्त लाभण्याला लोकमान्यांचा तिसच्या वेळचा दीर्घ तुरुंगवास हें कारण आह. गीतारहस्याच्या अगोदरच्या भावंडाचा संभव देखील तुरुंगांतलाच. सार्वजनिक कार्याचा व्याप सुटून ग्रंथलेखनाला लागणारी स्वस्थता तुरुंगांत मिळाली, पण प्रत्यक्ष ग्रंथलेखनाचा टप्पा गांठण्यापूर्वी त्यांस बयाच अडचणीशों टक्कर द्यावी लागली त्या अडचणी त्यांच्याच शब्दांत सांगणें या स्थळाँ चित आहे:-‘ग्रंथासंबंधीं तीनदां तीन हुकूम अलेि......सर्व पुस्तकें माझ्याजवळ -वण्याचे कांहा दिवसांनी बंद होऊन फक्त चार पुस्तकेंच मजजवळ एका वेळा ठेवावी असा हुकूम झाला. त्यावर बर्मा सरकारकडे मी अर्ज केल्यानंतर ग्रैथलेखनासाठीं म्हणून सर्व पुस्तकें मजजवळ ठेवावा असू हुकूम झाला. पुस्तकांची संख्या मी तथून निघालों तव्हां ३५० पासून ४०० पर्यंत झाली होती. ग्रंथलेखनासाठी जे कागद देत तहि सुटे न देता बांधलेला बुकें आतील पानें मोजून त्यावर पाठपोट अांकडे घालून देत असत व लिहिण्याकरिंता शाई न देतां शिसपन्सिर्लाच व त्याही करून देत असत.’ (ली. टिळकांची सुटकेनंतरची मुलाखत. केसरी ता. ३० जून, १९१४.) वाचकांनी कल्पनाशक्ताला थोडा ताण दिल्यास ग्रंथ लेिहिंतांना लोकमान्याला केिती अडचणी व त्रास सोसावा लागला असेल याचे चित्र डोळ्यांपुढे उभें रहाण्यास रकत नाही. तथापेिं न्यांस मॅfक न घालतां १९ १० व्या हिंवाळ्यांत हस्तलिखित प्रत त्यांनी लिहून तयार केली. पुस्तकाचा कच्चा खडा तयार झाल्याची माहिती त्यांनीं १९११ सालच्या प्रारंभी एका पत्रांत दिलेली असून तें पत्र १९११ साली मार्च महिन्यामध्यें ‘मराठा’ पत्राच्या एका अंकांत समग्र प्रसिद्ध झालेले आह. fीतारहस्यांतलें विवेचन लोकांस अधिक सुगम व्हार्वे म्हणून टिळकांनी १९१४ नालच्या गणेशोत्सवांत चार व्याख्यानं दिली, व नंतर ग्रंथ छापण्याच्या कामास गरंभ होऊन १९१५ च्या जून महिन्यांत त्याचा पूर्णावतार झाला. या पुढचा तिहास सर्वांच्या परिचयाचा आहेच. વ્યAG 04)િ૩