पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीताध्यायसंगति ما هايلا ज्या अर्थी वरील लोकंांत घातलेली आहत, त्या अर्थी गीतेंतील सातव्या व पुढील अध्यायांतील ज्ञानविज्ञानाचे निरूपण मुख्यतः कर्मयोगाच्याच परिपूत्यैथै केलेलें असून, त्यांतसंन्यासमार्गातील विधीचां जो समावेश होतो तो त्याच्या व्यापकपणामुळे होतो, कर्मयोग सोडून केवळ सांख्यनिष्ठेच्या समर्थनार्थहें ज्ञानविज्ञान सांगितलेलें नाहीं, असें उघड सिद्ध होतें. दुसरें अर्सेहि लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, सांख्यमागीं लोक ज्ञानाला जरी महत्त्व देत असले, तरी कर्माला किंवा भक्तीला ते कांहींच महत्त्व देत नाहीत; आणि गीतेंत भक्ति सुलभ व प्रधान मानिली आहे, इतकेंच नव्हे तर अध्यात्मज्ञान व भक्ति यांचे वर्णन चालू असतां जागोजाग “तूं कर्म म्हणजे युद्ध कर” असा अर्जुनास उपदेश केलेला आह (गी. ८.७; ११.३३; १६. २४:१८.६). म्हणून गीतेंतील सातव्या व पुढील अध्यायांतील ज्ञानविज्ञानाचें निरूपण मागें सहा अध्यायांत सांगितलेल्या कर्मयोगाच्या परिपृत्यैर्थ व समर्थनार्थच सांगितले आहे, केवळ सांख्यनिष्ट्रेचे किंवा केवळ भक्तीचे स्वतंत्र समर्थन या ठिकाणीं विवक्षित नाहीं, असा सिद्धान्त करणें भाग पडतें. आणि असा सिद्धान्त केल्यावर कर्म, भक्ति आणि ज्ञान असे गीतेचे तीन परस्पर स्वतंत्र विभाग होऊँ शकत नाहीत, इतकेंच नव्हे तर “तत्त्वमसि” या महावाक्यात तीनच पर्दे असून गतेिचे अध्यायूहि अठरा आहेत, म्हणून “सहात्रिक अठरा” या हिशोबानें सहासहा अध्यायांचे गीतेंचें तीन समान तुकडे करून पहिल्या सहा अध्यायांत ‘त्वम्’ पदाचे, दुसच्या सहांत ‘ततू’ पदाचे, आणि तिसन्या सहांत ‘असेि’ पदाचे विवेचन केलेलें आहे हें मतहि शुद्ध काल्पनिक आहे, असे आतां दिसून येतें. कारण सबंध गीतेंत केवळ ब्रह्मज्ञानच प्रतिपाद्य आहे व ‘तत्त्वमसि’ या महावाक्याच्या विवरणापलीकडे गीतेंत कांहीं जास्त नाहीं, हा एकदेशाय पक्षच अतिा शिल्लक रहात नाहीं. भगवद्गोतंत भक्ति व ज्ञान यांचे विवेचन कां आलें याचा याप्रमाणें एकदां उलगडा झाल्यावर सातव्यापासून सतराव्याअध्यायाच्या शेवटपर्यंत अकराहि अध्या यांची संगति सहज कळण्यासारखी आहे. ज्या परमेश्वरस्वरूपाच्या ज्ञानार्ने बुद्धि रसवर्ज व सम होत्ये, त्या परमेश्वरस्वरूपाचा विचार करणें तो एकदां क्षराक्षरटष्टया व एकदां क्षेत्रक्षेत्रज्ञदृष्टया करावा लागत असून, त्यावरून जें पिंडी तें ब्रह्मांडीं असा अखेर सिद्धान्त करितात हें मार्गे सहाव्या प्रकरणांत सांगितले आहे; व तच विषय आतां गीतेंत आले आहत. पण परमेश्वरस्वरूपाचा याप्रमाणे विचार करू लागलें म्हणजे परमेश्वरस्वरूप कधीं व्यक्त (ईद्रियगोचर) तर कधी अव्यक्त असतं असें आढळून येतें; आणि मग या दोन स्वरूपांपैकीं श्रेष्ठ कोणतें आणि या श्रेष्ठ स्वरूपापासून कनिष्ठ स्वरूप कसें उत्पन्न होतें इत्यादि अनेक प्रश्नांचाहि विचार या निरूपणांत करावा लागते. तसेंच परमेश्वराचे पूर्ण झान होऊन बुद्धि