पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० नीस त्या त्या वह्यांतील मजकुरापुरती आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ व समर्पण तिसच्या वहींत २४५ ते २४७ पानांत आहेत व प्रस्तावना चवथ्या वहींत ३४१ ते ३४३ व ३७५ तें ३८४ या पानांतून आहे. तुरुंगांतून सुटल्यावर प्रस्तावनेंत थोडी भर घालण्यांत आली व ती फक्त प्रकाशनकालीं उपयोगी पडलेल्या व्यक्तिनिर्देशापुरतीच आहे. हा मजकूर म्हणजे प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेपैकीं शेवटच्या अलीकडचा पॅरिग्राफ होय. शेवटचा पॅरिग्राफ तुरुंगांतच लिहिलेला आह. यांतील पहिल्या वहींतील पहिल्या आठ प्रकरणांना ‘पूर्वार्ध' अशी संज्ञा दिलेली आहे (हें वहीच्या पानाच्या फोटोवरून दिसून येईल). दुसच्या वहीस उत्तरार्ध भाग १ ला व तिसरीस उत्तरार्ध भाग २ रा अशा संज्ञा आहेत. यावरून ग्रंथाचे प्रथम दोन भाग करण्याचा त्यांचा विचार होता असें दिसतें. यापैकीं पहिल्या अठि प्रकरणांची वही फक्त सुमारें महिन्यांत लिहून तयार झाली व हीच प्रकरणें अतिशय महत्त्वाचीं अहित. यावरून लोकमान्यांच्या वेिषयाच्या ओतप्रेोत तयारीचे व लेखनाच्या अस्खलित ओघाचे यथाथै ज्ञान वाचकांस सहजच होईल. वह्यांचीं पानें फाउण्याला किंवा नवीं जोडण्याला तुरुंगाच्या नियमान्वयें त्यांस परवानगी नव्हती; पण विचारान्तf सुचलेल्या नव्या मजकुराची पानें मध्ये घालण्यासाठी त्यांनी परवानगी मिळाल्याची माहिती दुस-या व तिसच्या वहीच्या पुट्टयाच्या अांतल्या बाजूस दिलेली आढळते. पहिल्या तीन वह्या एकेक महिन्याच्या अवधींत लिहिलेल्या असून शेवटची वही अवघ्या पंधरा दिवसांत लिहून काढली आहे. मुख्य मजकूर उजव्या हाताकडच्या पानावर लिहिलेला असून त्या पानांमागल्या कोच्या पानांवर पुढील पानांतल्या मजकुरांत वाढणारा मजकूर जोडला आहे. मूळ प्रतीविषयींची जिज्ञासा वरील माहितीच्या योगानें पूर्ण होईल अशी उमेद आहे. या ग्रंथाचा जन्म होण्यापूर्वी प्रस्तुत विषयासंबंधीं त्याचा व्यासंग चालू होता याचे उत्तम प्रमाण त्यांचे दुसरे दोन ग्रंथ होत. 'मासानां मार्गशीर्षोंहं’ (गीता १०-३५. गी. र, पान ७६०) या लोकाचा अर्थ बसवीत असतां त्यांनी वेदाच्या महोदधींत उडी मारून, ‘ भोरायन ’ हें रत्न जनतेच्या स्वाधीन केलें आणि वेदोदधीचें पर्यटन करीत असतां ‘ आर्याचे मूलवसतिस्थान ’ शोधून काढलें. कालानुक्रमानें गीतारदस्य ग्रंथ शेवटचा असला तरी महत्त्वाच्या दृष्टीनें त्यालाच, वरील दोन पुस्तकांचा पूर्ववृतांत ध्यानांत ठेवल्यास आद्यस्थान द्यावें लागतें. गीतेसंबंधींच्या व्यासंगांतून ही पुस्तकें निर्माण झालेली आहेत. * श्रीरायन ? च्या प्रस्तावनंत लोकमान्यांनीं गीतेच्या अभ्यासाचा उल्लेख केला आहे.