पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुधर्मग्रंथांची सामान्य माहती. हिंदु धर्माला मूलभूत असणाच्या ग्रंथांमध्यें महत्त्व आणि कालानुक्रम या दृष्टीनें वेद हे श्रेष्ठ व आद्य अंसून यांतच संहिता, ब्राह्मणें व उपनिषदें यांचा अंर्तभाव केला जातो यज्ञयागादिकांचे कर्मकांड व परमार्थविचारांचे ज्ञानकोड या दोन्हींचा उगम वरील त्रयांत आहे. तथापि ज्ञानकांडाला मूलभूत आधारग्रंथ उपनिषदं होत. हिंदु धर्माच्या सामाजिक व्यवहारांचे नियंत्रण स्मृतिग्रंथांच्या द्वारें केलें जातें, पण यांचा मलाधार गृह्यसूत्रे आहेत. गृह्यसूत्राखेरीज अनेक सूत्रग्रंथ आहेत; परंतु त्यांचा धर्मव्यवहारांशी संबंध नसून केवळ विश्वाचें कोडें उलगडण्याकरितां सुरू झालेल्या विविध विचान्परंपरशी संबंध आहे. या विविध विचारपरंपरेलाच पड्दर्शनें म्हणतात. गौतमाची न्यायसूत्रं,वैशेषिकसूत्रं,जैमिनीची पूर्वमीमांसासूत्रे बादरायणांचीं वेदान्त किंवा त्रह्मसूत्रे, पातंजलीचीं योगसूत्रं इत्यादिकांचा षड्दर्शनात समावेश होते. पण षड्दर्शनाखेरीज अनेक सूत्रग्रंथ अहेित. त्यांतच पाणिनीसूत्रे, शूडिल्यसूत्रे, नार्दसूत्रे वगैरेची गणना होते. प्राचीन मूर्तिपूजाशून्य व निर्मळ पारंमार्थिक स्वरूपाच्या वैदिक धर्मात पालट होऊन उपास्यदेवता मानण्याची प्रवृति सुरू झाल्यावर, पुराणें जन्मास आलॉ. महाभारत, रामायण हीं पुराणें नसून इतिहास आहेत. पुराणांतच गीता आलेल्या आहेत. गीतारहस्य ग्रंथांत या विषयाचा प्रसंगानुसार अहापोह अह, पण वाचकाना याचे एकत्र ज्ञान व्हावें म्हणून खालों ही माहिती यादीच्या रूपानें सादर केली आहे:(१) वेद अगर श्रुतिग्रंथ: संहिता (ऋचांचा किंवा मंत्रांचा संग्रह) त्राह्मणें (आरण्यकें) उपनुिषदॆ (ज्ञानकांड) (२) शाखें:-- (१) धर्मग्रंथ:-गृह्यसूत्रे. स्मृतिग्रंथ (मनु, याज्ञवल्क्य व हारीत). (२) सूत्रेः-(षड्रदर्शनें), जैमिनी (मीमांसा अथवा पूर्वमीमांसा ) ब्रह (वेदान्त, शारीरक किंवा उत्तरमीमासा), न्याय (गौतम), योर (पातंजल), सांख्य-वैशेषिक (सांख्यकारिका). (३) इतर सूत्रेः-व्याकरण (पाणिनी). (नारद, शांडिल्य) भक्तिमार्गाचे सूत्रग्रंथ (३) इतिह्रासः-रामायण, मह्ाभारत ( हृरिर्वदा ). (५) ए राणेः--अष्टादश महापुराणें, उपपुराणे व गीता.

कर्म किंवा यज्ञकांड