पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*AY गीतारहस्य अथवा कर्मयोग भक्तिनिष्ठा स्वतंत्ररीत्या वर्णिली आहे” असे म्हणणें अगदीं गैराशस्त होय. किंबहुना असा अर्थ कोणी करूं नये म्हणूनच ‘येोगं युजन्’ हीं पदं या श्लोकांत मुद्दाम घातलेली आहेत असें म्हटलें तरी चालेल. गीतेच्या पहिल्या पांच अध्यायांत कर्माची अवश्यकता दाखवून सांख्यमार्गापेक्षां कर्मयोग श्रेष्ठ ठरविला आहे; आणि नंतर सहाव्या अध्यायात कर्मयेागास अवश्य लागणारा इंद्रियनिग्रह संपादन करण्याचीं पातंजल योगांतील साधनें वर्णिली आहेत. पण एवढ्यानें कर्मयोगाचे वर्णन पुरें होत नाही. इंद्रियनिग्रह म्हणजे कर्मेद्रियाची एक प्रकारची तालीम आहे. या तालमेने इंद्रियें आपल्या ताब्यांत ठेवितां येतात हें खरं, पण मनुष्याची वासनाच खोटी असेल तर इद्रियें ताब्यांत असून उपयेाग होत नाही. कारण वासना दुष्ट असल्यावर याच इंद्रियनिग्रहरूप सिद्धीचा जारणमारणादि दुष्कृत्ये करण्यांत कित्येक लोक उपयोग करतात, असे आढळून येतें. म्हणून इंद्रियनिग्रहाबरोबरच वासनाहि “सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि” याप्रमाणे शुद्ध पाहिजे (गी,६. २९), असें सहाव्याच अध्यायांत म्हटले आहे; आणि वासनेची ही शुद्धि ब्रह्मात्मैक्वरूप परमेश्वराचे शुद्ध स्वरूप ओळखिल्याखेरीज होणे शक्य नाही. तात्पर्य, कर्मयोगास अवश्य लागणारा इंद्रियनिग्रह संपादन केला तरी ‘रस' म्हणजे वेिषयांची गोडी मनांतून नाहीशी होत नाही. हा रस किवा विषयवासना नाहीशी होण्यास परमेश्वराचे पूर्ण ज्ञानच व्हावें लागतें, असें गीतेच्या दुसच्याच अध्यायांत म्हटले आहे (गी.२.५९). म्हणून हें परमेश्वराचे ज्ञान कर्मयोग आचरीत असतांच ज्या प्रकारानें म्हणजे विधीने होतें त्या विधींचें भगवान् आतां सातव्या अध्यायापासून वर्णन करीत आहत. 'कर्मयोग आचरीत असतां” या पदावरून कर्मयोग चालं असतांच हें ज्ञान संपादन करावयाचे आहे, त्यासाठी कर्मे सोडून द्यावयाचीं नाहींत, असेंहि सिद्ध होनें; व त्यामुळे कर्मयोगाऐवजी विकल्प म्हणून भक्ति व ज्ञान हे दोन स्वतंत्र मार्ग सातव्या अध्यायापासून पुढे सांगितले आहेत हे म्हणणें निर्मूल पडतें. गीतंतील कर्मयोग भागवतधमोतूनच घेतलेला असल्यामुळे कर्मयोगांतील ज्ञानप्राप्ताच्या विधांचे वर्णन म्हणजेच भागवत किंवा नारायणीय धर्मौतील विधीचे वर्णन होय; आणि याच अभिप्रायानें “प्रवृत्तिपरनारायणीय धर्म त्यांतील विधैसह भगवद्रोतंत वर्णिला आहे” असें वैशंपायनानें जनमेजयास शांतिपर्वाच्या अखेर सांगितले आहे (पहिल्या प्रकरणाच्या आरंभी दिलेले श्लोक पहा). वैशंपायनानें म्हटल्याप्रमाणे यांतच संन्यासमार्गातील विधींचाहि अंतर्भाव होतेो. कारण, कर्म करणें व कर्मे सोडणें असा जरी या दोन मागौत भेद असला तरी दोहोंकडे लागणारें ज्ञानविज्ञान एकच असल्यामुळे ज्ञान संपादन करण्याचे दोन्ही विाध एकच असतात. तथापि “कर्मयोग आचरीत असतां’ अशीं प्रत्यक्ष पदें