पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीताध्यायसंगति ४५३ सांख्य) या अस्तिनास्तिरूप दोन पक्षांखेरीज कर्माबद्दल तिसरा पक्षच आतां शिल्लक रहात नाही. म्हणून भक्तिमान् पुरुषाचा निष्ठा कोणती हें गीतेप्रमाणे ठरविणे अससल्यास सदरहू पुरुष भक्ति करिती एवढयावरूनच त्याचा निर्णय न करितां तो कर्म करिती किंवा नाहीं याचा विचार केला पाहिजे. भक्ति हें परमेश्वरप्राप्तीचें एक साधन आहे; व साधन या अर्थी भक्तीलाच जरी ‘ योग ’ म्हणतां आलें (गी. १४.२६), तरी ती अखेरची ‘निष्ठा’ होऊँ शकत नाहीं. भक्तीनें परमेश्वराचे ज्ञान झाल्यावर कर्मे करील तर कर्मनिष्ठ आणि न करील तर साख्यनिछम्हणावयाचा.पैकीं कर्मे करणे ही निष्ठा अधिक श्रेयस्कर असा भगवंतांनी आपला अभिप्राय पांचव्या अध्यायामध्यें स्पष्ट सांगितला आह. परंतुकर्म करण्यानें परमेश्वराचे ज्ञान होण्यास प्रतिबंध होते; आणि परमेश्वराच्या ज्ञानाखेरीज तर मोक्ष नाही; म्हणून कर्म सोडलाच पाहिजेत असा संन्यासमार्गाचा कमांवर महत्वाचा आक्षेप आहे. हा आक्षेप खरा नसून संन्यासमार्गानें जो मोक्ष मिळतो तोच कर्मयोगमार्गानेंहि मिळतो (गी. ५.५), असें पांचव्या अध्यायांत सामान्यतः सांगितले आहे. पण या सामान्य सिद्धान्ताचा तेव्हां कांहींच खुलासा केला नसल्यामुळे अपुच्या राहिलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नाचे म्हणजे कर्मे करीत असतां त्यानेंच अखेरीस परमेश्वराचे ज्ञान होऊन मोक्ष कसा मिळतो याचें आतां भगवान सार्वस्तर निरुपण करीत आहेत. याच हेतूनें सातव्या अध्यायाच्या आरंभा भाक्त ही स्वतंत्र निष्ठा तुला सांगतों असें न म्हणतां भगवान् अजुनास असें सांगतात की: मय्यासक्तमनाः पाथे योगं युंजन् मदाश्रयः । असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि ततुच्छृणु ॥ “हे पार्थी । माझ्या ठायी चितठेवून व माझा आश्रय करून येोग म्हणजे कर्मयोग आचरीत असतां‘यथा’म्हणजे ज्या प्रकारं माझें नि:संशय पूर्ण ज्ञान होईल, तें (तुला सांगतों)ऐक”(गी.७.१); आणि यासच पुढील लोकांत'ज्ञानविज्ञान’ म्हटलें आह (गी.७.२). पैकीं पहिल्या म्हणजे वर दिलेल्या 'मय्यासक्तमनाः०’ इत्यादि श्लेोकांतील ‘योगं युंजन्’ म्हणजे “कर्मयोग आचरीत असतां” हॉपदें अत्यंत महत्त्वाचीं आहेत; परंतु त्यांकडे कोणाहि टीकाकारानें विशेष लक्ष पुरावलेले दिसत नाहीं. योग म्हणजे अर्थातच पूर्वीच्या सहा अध्यायांतून वर्णिलेला कर्मयोग होय; आणि हा कर्मयोग आचरीत असतां ज्या प्रकारें म्हणजे विधीनें भगवंतांचे पूर्ण ज्ञान होईल तो विाध सांगण्यास आतां म्हणजे सातव्या अध्यायापासून सुरवात करितों, असा या श्लोकाचा अथै आहे, म्हणजे पहिल्या सहा अध्यायांचा पुढच्या अध्यायांशीं सबंध काय तो दाखविण्यासाठी हा श्रलेकि सातव्या अध्यायाच्या आरंभों मुद्दाम घातलेला आहे. म्हणून या लेोकाकडे दुर्लक्ष करून“सहा अध्यायांच्या पुढे