पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"くく गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट जें विवेचन वर केले आहे त्यावरूनू एवूढे स्पष्ट दिसून येईलकीं, ख्रिस्तास नाहीं तूर निदान नव्या करारांतील त्याचे चरित्र लिहिणाच्या त्याच्या भक्तांस तरी बौद्ध धर्माची माहिती असणें असैभवनीय नव्हतं; आणि ही गोष्ट जर असंभवनीय नाहीं तर क्षिस्ताच्या किंवा बुद्धाच्या चरित्रांत व उपदेशांत आढळून येणारें विलक्षण साम्य केवळ स्वतंत्ररीत्या उद्भवलेले असेल असें मानणेंहि सयुक्तिक दिसत नाहीं.* सारांश, मीमांसकांचा नुस्ता कर्ममार्ग, जनकादिकांचा ज्ञानयुक्त कर्मयोग (नैष्कम्यै), उपनिषत्कारांची व सांख्यांची ज्ञाननिष्ठा व संन्यास, चित्तनिरोधरूपी पातंजल योग, आणि पांचरात्र किंवा भागवतधर्म म्हणजे भक्ति, हीं सर्व धार्मिक अंगें व तत्त्वें मूळांत प्राचीन वैदिक धर्मातली आहेत. पैकी ब्रह्मज्ञान, कर्म व भक्ति हीं सोडून देऊन, चित्तनिरोधरूप योग व कर्मसंन्यास या दोन तत्त्वांच्या आधारें बुद्धानें आपंला संन्यासपर धर्म चारी वर्णास उपदेशिला होता; पण त्यांतच पुढे भक्ति व निष्काम कर्म यांची भर घालून बुद्धाच्या अनुयायांनी बुद्धधमाचा चोहॉकडे प्रसार केला. अशेोकाच्या वेळीं बौद्ध धर्माचा अशा रीतीनें प्रसार झाल्यानंतर शुद्ध कर्मपर यहुदी धर्मात संन्यासमार्गाचीं तत्त्वें शिरण्यास सुरुवात झाली; व अखेर त्यालाच भक्तिची जोड देऊन खिस्तानें आपला धर्म प्रवृत केला आहे; इतिहासावरून निष्पन्न होणारी ही परंपरा पाहिली म्हणजे डॅीं, लॉरिनसर म्हणतो त्याप्रमाणे ख्रिस्ती धर्मातून कांहीं तरी गीतेंत घेतलें जाण्याची गोष्ट तर दूरच, पण उलटपक्षीं आत्मौपम्यदृष्टीचीं, संन्यासाचीं, निर्वरत्वाचीं किंवा भक्तीचीं जीं तत्त्वें बायबलाच्या नव्या करारांत आढळून येतात, ती ख्रिस्ती धर्मातच बौद्ध धर्मातून म्हणजे परंपरेनेंवैदिक धर्मातून, घेतलेली असण्याचा मात्र बळकट संभव किंवा बहुतेक खातरी आहे; हिंदु लोकांस त्यांसाठी दुस-याच्या तोंडाकडे पहाण्याची केव्हांच बिलकुल जरूर नव्हती, असें पूर्णपणे सिद्ध हुँोतें. येणेप्रमाणें या प्रकरणाच्या आरंभी दिलेल्या सात प्रश्नांचा विचार झाला.हिंदुस्थानांत सध्यां प्रचलित असलल्या भक्तिप्रथांवर भगवद्गीतचा काय परिणाम घडून आला आहे वगैरे दुसरे कांहीं महत्त्वाचे प्रश्न यांना जोडूनच उद्भवतात. पण हे प्रश्न गीताग्रंथासंबंधाचे म्हणण्यापेक्षां हिंदु धर्माच्या अर्वाचीन इतिहासांतले आहेत असें म्हटलें पाहिजे. यासाठी, आणि विशेषतः हें परिशिष्टप्रकरण आटपतें घेतांघेतांहि आमच्या अजमासाबाहेर वाढलें म्हणून, गीतेचे बहिरंगपरीक्षण आतां येथे संपवितों.

  • रमेशचंद्र दत्त यांचे मत हंच असून तें आपल्या ग्रंथांत त्यानीं सविस्तर दिलें आहे, Romesh Chunder Dutt's History of Civilization in Ancient India VcI. II. Chap. pp. 328-340. -