पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ७ - गीता व ख्रिस्ती बायबल *Az 3 आतां कांहीं शंका नाहीं; आणि हा संबंध सिद्ध झाला म्हणजे यहुदि लोकांत प्रथम संन्यासपर एसी व पुढे संन्यासयुक्त भक्तिपर स्त्रिस्ती धर्माचा प्रादुर्भाव होण्यास बौद्वै धर्मच विशेष कारणीभूत झाला असावा असें सहज निष्पन्न होतें. इंग्रजा ग्रंथकार लिली यानें हेंच अनुमान केलेले असून, त्याच्या पुटाकरणार्थ फ्रेंच पंडित एमिलु बुर्नुफू व रोस्नी* यांचीं तत्सदृश मतें त्यानें आपल्या ग्रंथांत दाखल केली आहेत; आणेि जर्मन देशांत लैप्सिक येथील तत्त्वज्ञानशास्राचे अध्यापक प्रो. सेडन यांनी या विषयांवरील आपल्या ग्रंथांतूनहेि हंच मत प्रतिपादिले आहे. ख्रिस्ती व बौद्ध धर्म सवैस्वी सारखा नाही, दोहोंत कांहीं बाबतीत साम्य असले तरी दुसच्या बाबतीत वैषम्यहि बरेंच आहे, व त्यामुळे खिस्ती धर्म बौद्ध धर्मापासून निघाला हें मत ग्राह्य मानितां यत नाहीं, असें जर्मन प्रोफेसर श्रडर आपल्या एका निबंधांत म्हणतो. पण हें म्हणणें मुद्दयाला सोडून असल्यामुळे त्यांत कांहा अर्थ नाही. खिस्ती व बौद्ध धर्म सर्वाशीं एक आहत, असें कोणीच म्हणत नाही. कारण तसें असतें तर हे दोन धर्म भिन्नच गणले गेले नसते. मूळांत केवळ कर्ममय अशा यहुदी धर्मात सुधारणा म्हणून संन्यासयुक्त भक्तिमार्ग प्रतिपादणारा खिस्ती धर्म उद्भवण्यास काय कारण झाले असावें हा मुख्य प्रश्न आहे; आणि खिस्तापक्षां निःसंशय प्राचीन अशा बौद्ध धर्माचा इतिहास लक्षांत आणिला म्हणजे संन्यासपर भक्तीची व नीतीचीं तत्त्वें खिस्तानें स्वतंत्रपणें शोधून काढली असतील हें म्हणणें ऐतिहासिकदृष्टयूा संभवनाय दिसत नाहीं. खिस्तु आपल्या बाराव्या वर्षापासून तीस वर्षाचा होईपर्यंत काय करीत होता, अगर कोठे होता, याबद्दल बायबलांत कांहींच माहिती मिळत नाही. हा काल त्यानें ज्ञानार्जनांत, धर्मचिंतनांत आणिप्रवासांत घालविला असेल हें उघड आहे. म्हणून या अवधींत त्याचा व बौद्ध भिक्षूचा प्रत्यक्ष किंवा पर्यायानें संबंध घडून आला नसेलच असें खात्रीनं सांगतां यणे अशक्य आहे; कारण बौद्ध यतचिी चळवळ त्या वेळीं ग्रीसदेशापर्यंत पोंचलेली होती. नेपाळांतील एका बौद्ध मूठांतल्या ग्रंथांत येशू त्या वळीं हिदुस्थानांत आला होता व तेथे त्यास बौद्ध धर्माचे ज्ञान झाले, असें स्पष्ट म्हटलें आह. निकोलस नोटोव्हृिश या नांवाच्या एका रशियन गृहृस्थास हा ग्रंथ उपलब्ध होऊन त्यानें त्याचे भाषांतर सन १८९४ सालीं फ्रेंच भाषेत प्रासद्ध केलें अहि. नोटी व्हिश याचे भाषांतर बरोबर असले तरी मूळ ग्रंथ मागाहून कोणीं तरी लबाडानें बनावट रचिलेला आहे, असें बच्याच रित्रस्ती पंडितांचे म्हणणें आहे; आणि सदर ग्रंथ या पंडितांनी खराच मानावा असा आमचाहि विशेष आग्रह नाही. नोटोव्हिश यास उपलब्ध झालेला ग्रंथ खरा असो वा.प्राक्षप्त असो, केवळ ऐतिहासिकट्टया आम्हीं

  • See Lillie's Buddha and Budahism, pp. 158, //,