पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्य अथवा कर्मयोग بها ک कारांच्या पदरची आहे; आणि गीतेंत फक्त मोक्षोपायांचाच विचार केला आहे अशी त्यांची समजूत असल्यामुळे त्यांना या तीन निष्ठा प्रायः भागवतावरून सुचलेल्या आहत (भाग.११.२०.६). पण भागवतपुराण व भगवद्गीता याचे तात्पर्य एक नाहीं ही गोष्टटीकाकारांच्या लक्षांत आलेली नाहीं. नुस्त्या कर्मानीं मोक्ष मिळत नाहीं, मोक्षासाठी ज्ञान पाहिजे हा सिद्धान्त भागवतकारांसहि मान्य आहे.पण याखेरीज भागवतपुराणाचे असेंहि म्हणणें आह की, ज्ञान व नैष्कम्यै हा जरी मोक्षप्रद असलीं तरी तों दोन्ही (म्हणजे गीतंतील निष्काम कर्मयोग) भक्तीवांचून शोभत नाहीत,नैष्कर्म्यमप्यच्युतभाववर्जितं न शोभते ज्ञानमलं निरंजनम् (भाग.१२.१२.५२व १. २.१२), याप्रमाणे पाहिले तर भागवतकार भक्ति हीच काय ती एक खरी निष्ठा म्हणजे अखेरची मोक्षप्रद स्थिति मानितात असें उघड होतें. भगवद्भक्तांनी ईश्वरार्पणबुद्धीनें कर्म करूंच नये असें भागवत म्हणत नाही व केलेच पाहिजे असेंहि सांगत नाहीं. निष्काम कर्म करा वा न करा, हे सर्व भक्तियोगाचेच निरनिराळे प्रकार होतात (भाग.३ २९.७-१९), भक्ति नसेल तर सर्व कर्मयोग पुनः संसारांत म्हणजे जन्ममरणाच्या फेन्यांत पाडणारे होत (भाग.१.५.३४,३५), असें भागवत सांगत आहे. सारांश, भागवतकारांचा सवै कटाक्ष भक्तीवरच असल्यामुळे त्यांनीं निष्कामकर्मयोगालाहिं भक्तियोगांतच ढकलून, भक्ति हीच एक खरी निष्ठा असें प्रतिपादन केले आहे. पण भक्ति हाच कांहीं गीतेंतील मुख्य प्रतिपाद्य विषय नाहीं म्हणून भागवतातील वरील सिद्धान्त किंवा परिभाषा गीतेंत घुसडून देणें म्हणजे वडाची साल पेिपळास लावण्यासारखें अयोग्य होय. परमेश्वराच्या ज्ञानाखेरीज मोक्षप्राप्ति दुसच्या कशानेंहेि होत नसून हें ज्ञान संपादन करण्यास भक्ति हा सुलभ मार्ग होय, हें म्हणणें गतेिस पूर्णपणे मान्य आहे. पण याच मार्गाबद्दल आग्रह न ठेवितां मोक्षप्राप्तीस अवश्य लागणारें ज्ञान ज्याला जो मार्ग सोपा दिसल त्या मार्गानें त्यानें संपादन करून घ्यावें असें गीता सांगत असून, अखेर म्हणजे ज्ञानप्राप्तीनंतर कर्मे करावा का न करावी हा गीतेंतला मुख्य मुद्दा आहे. म्हणून कर्म करणे व कर्म सोडणे असें जीवन्मुक्त पुरुषांच्या आयुष्यक्रमणाचे जगांत आढळून येणारे जे दोन मार्ग तेथपासून गीतेला सुरुवात केली असून यापैकीं पहिल्या मागीस भागवतकारांप्रमाणें ‘भक्तियोग’ असें नवें नांव न देतां ईश्वरार्पणबुद्धीनें कमें करणे यास ‘कर्मयोग' किंवा ‘कर्मनिष्ठा’ आणि ज्ञानोत्तर कमें सोडणे यास ‘सांख्य' किंवा ‘ज्ञाननिष्ठा,’ हीं नारायणीयधर्मातील प्राचीन नांवें गीतंत ठेविलीं आहत. गीतेंतील ही परिभाषा स्वीकारून विचार केला तर ज्ञान कर्म यांच्या तोडीची भक्ति ही तिसरी स्वतंत्र निष्ठा केव्हांच होऊं शकत नाहीं. ६. दिसून येईल. कारण, ‘कमें करणे’ आणि ‘न करणे म्हणजे सोडणे' (योग व