पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८६ गीतारहस्य अथवा कमैयेोग-परिशिष्ट ज्ञानकांडांतून म्हणजे उपनिषदांतूनच पुढं भक्ति, पातंजलयोग किंवा अखेर बौद्ध धर्म कसकसा निघाला हें सयुक्तिकरीत्या क्रमवार दाखवितां येतें. पण यज्ञमय यहुदी धर्मात संन्यासपर एसी किंवा ख्रिस्ती धर्माचा उद्भव अशा प्रकारें झालेला नाही. तो एकदम उत्पन्न झाला आहे; व तो अशा रीतीनें एकदम उत्पन्न होण्यास यहुदी धर्मावाहेरचे कांहीं तरी कारण घडलेले आह, वगैरे गोष्टी प्राचीन ख्रिस्ती पंडितांसहि मान्य असल्याचे वर सांगितले आहे. शिवाय ख्रिस्ती व बौद्ध धर्मात जें साम्य दिसून येतं तें इतकं विलक्षण व पूर्ण आहे की, तसलें साम्य स्वतंत्ररीत्या उद्भवणे शक्यहि नाहीं. यहुदी लोकांस तेव्हां बौद्ध धर्माची माहिती होणेंच सर्वथा अशक्य होतें असें जर सिद्ध झाले असतें तर गोष्ट निराळी. पण अलेक्झांडरच्या वेळेपासून पुढे-आणि अशोकाच्या वेळा (म्हणज ख्रिस्तापूर्वी सुमारें २५० वर्षे) तर खासच,--बौद्ध यतीचा प्रवेश पूर्वकडे ईजिपमधील अलेक्झांड्रिया व ग्रीसदेश यथपर्यंत झालेला होता, असें इतिहासावरून सिद्ध होतें. अशोकाच्या एका शिलालेखांतच असें लिहिले आहे की, त्यानें यहुदी लोकांच्या राभोवारच्य देशांचा ग्रीक राजा जो अििटओकस त्याशी तह केला होता. तसँच खिस्त जन्मला तेव्हां पूर्वेकडील कांही ज्ञानी पुरुष जेरुशलेम येथे गेलेले होते असें वायबलांतहि वर्णन आहे (माथ्यू. २.१) हे ज्ञानी पुरुष मगी म्हणजे इराणी धर्माचे असावे, हिदुस्थानांतले नव्हते, असें त्रिस्ती लोक म्हणतात. पण कांही म्हटलें तरी अर्थ एकच कारण, या कालापूर्वीच बौद्ध धर्माचा प्रसार काश्मीरांत व काबुलांत होऊन पूर्वेकडे इराण व तुर्कस्थानापर्यंत त्याची मजल गेलेली होती असें इतिहासावरून स्पष्ट होतें. शिवाय ख्रिस्ताच्या वेळी हिंदुस्थानांतला एक यति तांबडया समुद्राच्या किना=यावर व अलेक्झांड्रियाच्या आसपास दर वर्षी येत असे, असें प्लूटार्क यानें स्वच्छ लिहिले आहे ५: तात्पर्य खिस्ताच्या पूर्वी दोनतीनशे वर्ष यहुदी लोकांच्या देशांत बुद्धधर्मी यतीचा प्रवेश होऊं लागला होता याबद्दल

  1. See Put arch's Morals Theorophica ( /ts ways, translated by C, N Kung (George Bell & Sons) p 96,97 qTrst Hālāzijā (९९.३९) यवनाच्या म्हणजे यीकृॉया. अलसंदा (योन-नगराऽलसंदा) नामक शहराचा

असून, तेथून इ. स. पूर्वी कांहीं वर्षे स्लिोन्त एक देऊळ बांधण्याचे काम चालू असतां बरेच बौद्व यति उत्सवासाठीं गेले होते असे म्हटले आहे. महावंशाचे इंग्रजी भाषांन्त्रकार अलसेदा शब्दान ईजिप्त देशांतील अलेक्झांड्रिया न घेतां, काबुलांत या नांवाचे अलेक्झांडरन वसविलेले एक गांव अलसंदा शब्दानं या स्थली विवक्षित आहे असे म्हणतात, पूण हें म्हणणे बरबर नाहीं, कुारण या लहुन गृवाला कोणीं यूवनांचे नगर म्हटुलें नसतें. शिवाय अशोकाच्या वर निर्दिष्ट केलेल्या शिलालेखांतच यवनांच्या राज्यांत बौद्ध भिक्षु पाठविल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.