पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ७-गीता व ख्रिस्ती बायबल ५८१ यांसच नव्हे तर मॅक्समुल्लर आदि करून प्रमुख पाश्चमात्य संस्कृतज्ञ पंडितांसहि अमान्य झालेली आहेत. गीता एकदां निःसंशय खिस्तापूर्वीची ठरल्यावर गीता आणि बायबल यांच्यामधील आपण दाखविलेलीं शेंकडों अर्थसादृश्यें व शब्दसादृश्यें भुतासारखीं उलट आपल्याच गळ्यांत पडतील ही कल्पनाहि बिचाच्या लॉरिनसरास आलली नसेल ! पण जी गोष्ट स्वप्नांतहि घडून येत नाहीं तीच कधीकधीं प्रत्यक्ष डोळ्यापुढे उभी रहात असत्ये असें म्हणतात तें कांहीं खोटें नाहीं; आणि वास्तविक पाहिले तर डा. लॉरिनसर यांस उत्तर देण्याची देखील आतां कांहीं अवश्यकता राहिलेली नाहीं. तथापि केित्येक बडया इंग्रजी ग्रंथांतून अद्यापहि या खोटया मताचा अनुवाद केलेला आढळून येत असल्यामुळे यासंबंधानं अर्वाचीन शोधांअन्तों काय निष्पन्न झाले आहेतेंहि शेवटी येथे थोडक्यांत सांगणे अवश्य आहे. कोणत्याहेि दोन ग्रंथांतील सिद्धान्त एकसारखे आहेत एवढ्याच गोष्टीवरून त्यांपैकीं पहिला कोणता व मागाहूनच कोणता याचा निर्णय होऊं शकत नाहीं हें प्रथमतः लक्षात ठेविले पाहिजे. कारण (१) या दोहोंपैकीं पहिल्या ग्रंथांतील विचार दुस-यावरून,किंवा(२) दुसच्या ग्रंथांतील विचार पहिल्यावरून घेतले असतील, असे दोन्ही पक्ष या ठिकाणीं संभवतात. म्हणून कोणत्याहि दोन ग्रंथाचे काल स्वतंत्ररीत्या प्रथम निश्चित केल्यानंतर मग विचारसादृश्यावरून अमक्यानें अमक्यापासून अमुक विचार घेतले असतील असें ठरवावें लागते. शिवाय एकमेकांसारखे विचार दोन देशांत दोन ग्रंथकारांस स्वतंत्रपणे एकाच कालीं किंवा भिन्न कालीं सुचणें अगदीच अशक्य नसल्यामुळे दोन ग्रंथांमधील साम्य पहातांना तें स्वतंत्ररीत्या उद्भवण्यासारखें आहे कीं नाहीं, आणि ज्या दोन देशांत हे ग्रंथ झाले त्यामध्यें तत्कालीं कांहीं दळवळण असून एका देशांतून हे विचार दुस-या देशांत जाण्याचा संभव होता कीं नाहीं, याचाहि विचार करोवा लागतो. याप्रमाणे सर्व बाजूंनी पाहिलें म्हणजे ख्रिस्ती धर्मातून गीतेंत कोणतीहि गोष्ट घेतली जाणे अशक्य, इतकेंच नव्हे तर गीतेंतील तत्त्वांसारखीं जो कांहीं तत्त्वें ख्रिस्ती बायबलांत आढळून येतात ती उलट बायबलांतच बौद्ध धर्मातून-म्हणजे पर्यायानें गौतेंतून किंवा वैदिकधर्मातूनच-ख्रिस्तानें किंवा त्याच्या शिष्यांनी घेतलेली असण्याची पूर्ण संभव आहे असें आढळून येतं; आणि कांहीं पाश्चिमात्य पंडित आतां तसें उघड म्हणूहिंलागले आहे. तागडीचे पारडें याप्रमाणे फिरलेले पाहिल्यावर कट्टया ख्रिस्तभक्तांस आश्चर्य वाटून ही गोष्ट नाकरण्याकड त्यांच्या मनाचा कल झाल्यास त्यांत कांहीं नवल नाहीं. पण अशा गृहस्थांस आमचे एवढेच सांगणें आह की, हा प्रश्न धार्मिक नसून ऐतिहासिक असल्यामुळे, इतिहासाच्या नहमीच्या पद्धतीप्रमाणें हल्लीं उपलब्ध झालेल्या माहितीवरून शान्त विचारान्ती जीं अनुमानें निघतील ती सर्वानी,--व त्यांतहि