पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ६-गीता व बौद्ध अँथ *\so शुकराजा कनिष्क याच्या कारकीर्दीत बौद्ध भिक्षूची जी एक महापरिषद भरली होती त्यांत महायानपंथाचे भिक्षु हजर होते, असेा बौद्ध ग्रंथांत उल्लेख असून या महायानपंथाचा ‘अमितायुसुत' नांवाचा जो प्रधान सूत्रग्रंथ त्याचे इ. स. १४८ च्या सुमारास चिनी भाषेत भाषांतर झालेले सध्यां उपलब्ध आहे. परंतु आमच्या मतें हा काल याहूनहि प्राचीन असला पाहिजे. कारण, इ. स. पूर्वी सुमारें २३० वर्षे अशोकानें जे शिलालेख प्रसिद्ध केले आहेत त्यांत संन्यासपरं निरीश्वर बौध्द धर्माचा विशेष उल्लेख नसून भूतदयेचा प्रवृतिपर बौध्द धर्मच सर्वत्र उपदेशिला आहे. तेव्हां अर्थात् तत्पूर्वीच बुध्दधर्माला महायान पंथांतील प्रवृत्तिपर स्वरूप येण्यास सुरुवात झाली होती असें उघड होतें. बौध्द यति नागार्जुन हा या पंथाचा प्रमुख पुरस्कर्ता होता, मूळ उत्पादक नव्हे. ब्रह्म किंवा परमात्मा यांचे अस्तित्व नाकबूल करून मन निर्विषय करण्याच्या उपनिषदूांतील केवळ निवृत्तिमार्गाचा अंगीकार करणाच्या मूळ निरीश्वरवादी बुद्धधमातूनच पुढे कमाक्रमानें स्वाभाविकरीत्या भक्तिपर् प्रवृतिमार्ग निघणे शक्य नसल्यामुळे,बुध्दाच्या निर्वाणानंतर लवकरच बौध्द धर्मास जें हें कर्मप्रधान भक्तिस्वरूप प्राप्त झालें त्यास बौध्द धमीबाहेरचे तत्कालीन कांहीं तरी कारण असलें पाहिजे हें उघड आहे; आणि हें कारण कोणतें याचा विचार करूं लागलें म्हणजे भगवद्गीतेकडे दृष्टेि गल्याखेरीज रहात नाही. कारण, हिंदुस्थान देशांत तत्कालीं प्रचलित असलेल्या धर्मापैकीं जैन धर्म व उपनिषध्दर्म पूर्ण निवृतिपरच होते; आणि वैदिक धर्मातील पाशुपत किंवा शैव वगैरे पंथ जरी भक्तिपर होते तरी प्रवृतिमार्ग व भक्ति यांचा मेळ भगवद्गीतखेरीज कोठेच आढळून येत नव्हता, हें आम्हीं गीतारहस्याच्या अकराव्या प्रकरणांत स्पष्ट करून दाखविले आहे. गीतेंत भगवान् आपल्याला पुरुषोत्तम हें नांव घेत असून, मी पुरुषोत्तमच सर्व लोकांचा ‘पिता’ व ‘पितामह' (९.१७) असून सर्वांना ‘सम’ आहें, मला कोणी द्वेष्य व प्रिय नाहीं (९.२९), मी अज व अव्यय असतांहि धर्मसंरक्षणार्थ वेळोवेळीं अवतार धारण करितें (४.६-८), मनुष्य कितीहि दुराचारी असला तरी मला भजूं लागल्यानें साधुच होतेो ‘....” किंवा मला भक्तीनें एखादं फूल, पान, थोडें पाणीहि दिल्यानें मी संतोषानें प्रहण करितों (९.२६), आणि अज्ञ लोकांसाठीं भक्ति हा सुलभ मार्ग आहे (१२.५), इत्यादि विचार भगवद्गीर्तत आलेले आहत; आणि ब्रह्मनिष्ठ पुरुषांनीं लोकसंग्रहार्थ अंगीकारिला पाहिजे हें तत्त्च तर गीतेखेरीज दुसरें कोठेच सविस्तर नाही. म्हणून वासनाक्षयाचा केवळ निवृतिपरं मार्ग मूळ बुद्धधर्मात जसा उपनिषदांतून घेतलेला आहे, तसें पुढे महायानपंथांत प्रवृतिपर भक्तितत्त्वहि

  • f、も。ミws