पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीताध्यायसंगति ¥wፃ ‘‘यो मां पश्यति सर्वत्र सर्वे च माय पश्यति” (६.२९,३०) अशा प्रकारॆ सर्वोभूतीं सम झाली पाहिजे, अशी आत्मैक्यज्ञानाचीहि अवश्यकता या अध्यायांत वर्णिली आहे. इतक्यांत अर्जुनाला अशी शंका आली कीं, याप्रमाणें साम्यबुद्धिरूप योग एका जन्मांत साध्य न झाल्यास, पुनः दुसच्या जन्मॉहि अगदी आरंभापासूनच सुरुवात करावी लागल्यामुळे पुनः तीच गति होणार आणि याप्रमाणें रहाटगाडगें सुरू झालें म्हणजे या मार्गानें मनुष्यास सद्गति मिळणे कधींच शक्य नाहीं. ही शंका दूर करण्यासाठी योगमार्गौत कांहीं फुकट जात नाहीं, पहिल्या जन्माचे संस्कार शिल्लक राहून दुसच्या जन्मांत त्यापेक्षां अधिक अभ्यास होतो व क्रमाक्रमानें अखेर सिद्धि मिळत्ये असें सांगून, शेवटीं कर्मयोग याप्रमाणें श्रेष्ठ व क्रमशः सुसाध्य असल्यामुळे नुस्ती (म्हणजे फलाशा न सोडितां) कर्मे करणे, तपश्चर्या करणे, व ज्ञानानें कर्मसंन्यास करणे, हे सर्व मार्ग सोडून तूं योगी म्हणजे निष्काम कर्मयोगाचे आचरण करणारा हो, असा या अध्यायाचे अखेरीस अर्जुनास पुनः स्पष्ट व निश्चित उपदेश आहे. कित्येकांचे असें मत आहकीं, कर्मयोगाचे विवेचन येथे म्हणजे पहिल्या सहा अध्यायांत संपले व यापुढे ज्ञान व भक्ति या दोन निष्ठा भगवंतांनीं ‘स्वतंत्र'-म्हणजे परस्परानरपेक्ष किंवा कर्मयोगाच्या तोडीच्याच पण त्याहून भिन्न व त्याच्याऐवजीं विकल्प म्हणून आचरण्यास योग्य अशा-वर्णिल्या आहेत; पैकीं सातव्या अध्यायापासून बाराव्या अध्यायापर्यंत भक्ति व पुढे बाकी राहिलेल्या सहा अध्यायांत ज्ञान सांगितले असून, अठरा अध्यायांची याप्रमाणें वांटणी केली म्हणजे कर्म, भक्ति व ज्ञान यांपैकीं प्रत्येकाच्या वांट्यास सहासहा अध्याय येऊन गीतेचे सारखे भाग होतात. परंतु हें मत बरोबर नाहीं. सांख्यनिष्ठेप्रमाणे युद्ध सोडून देऊँ किंवा युद्धाचे घोर परिणाम डोळयांपुढे दिसत असतांहि युद्धच करूं, व कर म्हटल्यास त्याचे पाप कसें टाळू, अशी अर्जुनाची भुख्य शंका होती व त्या शकेचे समाधान “ज्ञानानें मोक्ष मिळतो व कर्मानेंहि मिळतो” किंवा “तुला पाहिजे तर भक्तीची तिसरीहि एक निष्ठा आहे,” अशा धरसोडीच्या व बाष्कळ उत्तरानें होणे शक्य नव्हतें, हें पांचव्या अध्यायाच्या आरंभींच्या लोकांवरून स्पष्ट होतें. शिवाय अर्जुन एक निश्चयात्मक वाट विचारीत असतां सर्वज्ञ व चतुर श्रीकृष्णानें मुद्दा सोडून त्याला तीन स्वतंत्र व विकल्पात्मक वाटा दाखविल्या असें मानणेंहि गैरशिस्त होय. खरें पाहिले तर गीतंत ‘संन्यास’ आणि ‘कर्मयोग’ या दोनच निष्ठांचा विचार असून (गी.५.१). त्यांपैकीं ‘कर्मयोग’ हा आधक श्रेयस्कर असा स्पष्ट निकाल केला आहे (गीं.५.२). भक्तीची तिसरी स्वर्तत्र निष्ठा कोठेच सांगितलेली नाहीं. अर्थात् ज्ञान, कर्म आणि भक्ति या तीन स्वर्तत्र निष्ठांची कल्पना सांप्रदायिक टीका