पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट چ و مها हें बौद्ध भिक्षचे कर्तव्य होय असे म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं; आणि हेच मत महायानपंथाच्या सद्धर्मपुंडरीकादि ग्रंथांत प्रतिपादिलें असून ‘ गृहस्थाश्रम चालवून निर्वाणपद प्राप्त होणें अगदींच अशक्य नाहीं, किंबहुना अशीं पुष्कळ उदाहरणेंहि आहत,” असें नागसेनानें मिलिंदास सांगितले आहे (मि. प्र. ६.२.४). हे विचार अनात्मवादि व केवळ संन्यासपर मूळच्या बुद्धधर्मातले नव्हेत, अगर शून्यवाद किंवा विज्ञानवाद स्वीकारूनहि त्यांची उपपात लागत नाहीं, हें कोणाच्यााहे सहज लक्षांत येईल; आणि खुद्द बौद्धधमोतच पुष्कळांस हे विचार बुद्धाच्या मूळ उ देशाच्या विरुद्ध आहत असें प्रथम वाटत होतें पण हें नवें मतच साहजिक रीत्या पुढे अधिकाधिक लोकप्रिय होऊंलागले; आणि बुद्धाच्या मूळ उपदेशाप्रमाणे चालणा-यास ‘हीनयान’ (हलका मार्ग)व या नव्या पंथास ‘महायान’ (मोठा मागै) हीं नांवें प्राप्त झालीं.f चीन, तिबेट, जपान वगैरे देशांतून हल्लीं जो बौद्ध धर्म प्रचारांत आहे तो महायानपंथाचा आहे; व बुद्धाच्या निर्वाणेानंतर बौद्ध धर्माचा झपाट्यानें प्रसार होण्यास महायानपंथांतील भिक्षुसंघाचा दीर्घौद्योगच कारण झालेला आहे. बौद्ध धर्मोत जी ही सुधारणा झाली तिचा उद्भव शालिवाहन शकापूर्वी सुमारें तीनशें वर्षापूर्वी झाला असावा डा. केर्न यांनी ठरावले आहे. कारण,

  • सुत्तनिपातांत खग्गविसाणमुत्ताच्या ४१ श्लोकाच ध्रुवपदू“एको चुर खरगविसाणकप्पी' अस आह. खग्गविसाण म्हणजे गेडा व त्याप्रमाणे बौद्ध भिक्षुनें रानांत एकटें रहावे असा याचा अथे आहं. * в 4

fहीनयान व महायान या पंथांतील भेद वर्णन करीत असतां डा. केने म्हणतो कीं, “Not the Arhat who has shaken off all human feeling, but the generous, self-sacrificing active Bodhisattva is the ideal of the Mahayanists, and Lhis attractive side of the creed ha", more perhaps than anything else, contributed to their wide conquests, whereas S. Buddhism has not been able to make conve:ts except where the soil had been prepared by Hinduism and Mahayanism." —Janual of Indian Buddhism p 69 Southern Buddhism म्हणजे हीनयान होय महायानपंथांत भक्तिचाहेि समावेश झालेला होता.**Mahayanism lays a great stress on devotion, in this respect as in many others harmonising with the current of feeling in India which led to the growing umportance of Bhakti,” Ibid. p. 124 tSee Dr Kern s Manual of Indian Buddhism pp 6,69 and 119 मिलिद (मिनेंडर नामकु श्रीक राज) हा इ स पूर्वी सुमारें १४० किंवा १५९ व्यु बुर्मी हिंदुस्थानच्या वायव्येस बैंक्ट्यूिा देशांत राज्य कुरीते होती. तेठूहां त्यास नागसेनानें बौद्ध धर्माची दीक्षा दिली अस मिलिंदप्रश्नांत म्हटलेल आहे. बौ वृीं ही कामे महायानपंथांतील लोकच करीत असल्यामुळे महायानपथ तेव्हां उद्भवला होताहं उघड आहे.