पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ६-गीता व बौद्ध ग्रंथ هاواه भव्य मूर्ति व चरित्रकम लोकांच्या डोळ्यांपुढे जोंपर्यंत प्रत्यक्ष होता तोंपर्यंत या मागीची कांहीं जरूरहि नव्हती. पण हा धर्म पुढे सामान्य जनांस प्रिय होऊन त्याचा जास्त जास्त प्रसार होण्यास, संसार सोडून व भिक्षु होऊन मनोनिग्रहानें (कशांत हें न समजत) जागच्या जागीं निर्वाण पावणें, या निरीश्वर निवृतिमार्गापेक्षां दुसरा कांहीं तरी सोपा व प्रत्यक्ष मागै लोकांस दाखविणे जरूर पडलें. किंबहुना, सामान्य बुद्धभक्तांनी तत्काली प्रचलित असलेल्या वैदिक भक्तिमार्गाचे अनुकरण करून बुद्धाच्या उपासनेस आपण होऊनच प्रथम सुरुवात केली असेल असेंहि संभवनीय आह. म्हणून बुद्धाच्या निर्वाणानंतर लवकरच बौद्ध धर्मातील पंडितांनी बुद्धालाच “स्वयंभू व अनाद्यनंत पुरुषेोत्तमाचे” रूप दिले आणि बुद्ध निर्वाणपावला ही त्याची केवळ लेोंला असून “खरा बुद्धकधीं नाश पावत नसून सदैव कायमच असतो” असें ते म्हणू लागले. तसेंच हा खरा बुद्ध “सर्व जगाचा पिता व लोक ही त्यांचीं लेकर” असल्यामुळे तो सर्वांनाच “संम असून कोणावर प्रीति करीत नाहीं व कोणाचा द्वेषहि करीत नाहीं,” “धर्माची घडी बिघडली म्हणजे 'धर्मकृत्यांसाठीं तोच वेळोवेळीं बुद्धाच्या रूपानें प्रकट होत असतो,” आणि या देवातिदेव बुद्धाची “भक्ति केल्यानं, त्याच्या ग्रंथाची पूजा केल्यानें, त्याच्या डागोबापुढे कीर्तन केल्यानें,” किंबहुना “त्यास भक्तीनें मूठमर कुमळे किंवा एखादें फूल वाहिल्यानेंहि” मनुष्यास सद्गति प्राप्त होत्ये, असें बौद्ध ग्रंथांतून प्रतिपादन होऊं लागलें (सद्धमपुंडरीक २.७७-९८; ५.२२; १५.५-२२ व मिलिंदप्रश्न ३.७ ७पहा).* “मनुष्याचे सर्व आयुष्य दुराचरणांत गेले असले तरी मृत्युसमयीं जर तो बुद्धास शरण जाईल तर त्याला स्वर्ग प्राप्त झाल्याखेरीज रहाणार नाहीं” असेंहेि मिलिंदप्रश्नांत म्हटलें आह (मि. प्र. ३.७.२); आणि सर्व लोकांचा “आधकार, स्वभाव व ज्ञान एकाच प्रकारचे नसल्यामुळे, अनात्मपर निवृातपर मार्गाखेरीज भक्तीचा हा मागै (यान)बुद्धानेंच दयाळु होऊन आपल्या ‘उपायकौशल्यानें’ निर्माण केला आहे,” असै सद्धर्मपुंडरीकाच्या दुसच्या तिसच्या अध्यायांत सविस्तर रीतीनें वर्णिले आहे. निर्वाणपदाची प्राप्ति होण्यास भिक्षुधर्मच स्वीकारिला पाहिजे असें जें स्वतः बुद्धानें सांगितलेलें धर्मतत्त्व तें अजाबात सोडून देणें केव्हांहि शक्य नव्हतें; कारण, तसें करणे म्हणजे बुद्धाच्या मूळ उपदेशास हरताळ लाविण्यासारखें झालें असतं. पण भिक्षु झाला तरी अरण्यांत ‘गेंड्था’प्रमाणें एकटेंच व उदासीनपणें न रहातां धर्मप्रसारादि लोकहिताचीं व परोपकाराचीं कामें ‘निरिस्सित’बुद्धीनें करणें,

  • ‘सद्धर्मपुंडरीक’ या ग्रंथाचे प्राच्यधर्मपुस्तकमालंत खंड २१ मध्यें भाषांतर झालें आहे. हा ग्रंथ मूळचा संस्कृत भाषेतला असून तो मूळ संस्कृत भाषेतला देखील आतां प्रसिद्ध झाला आहे.