पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

১৭৩৮ गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट नंतर झालेलें आह हें उघड आह. म्हणून केवळ लोकसादृश्यावरून हल्लीचे महाभारत बौद्ध ग्रंथांच्या पूर्वीचेच असले पाहिजे असा ठाम निर्णय करितां येत नाहीं; आणि गीता हा महाभारताचाच एक भाग असल्यामुळे तोच न्याय गीतेसहि लागूं होऊँ शकेल. शिवाय गीतेंतच ब्रह्मसूत्रांचा उल्लेख असून ब्रह्मसूत्रांत बौद्ध मतांचे खंडन आहे हें पूर्वीच सांगितले आहे. म्हणून ही शंका दूर होऊन गीता बौद्ध ग्रंथांच्या पूर्वीची आहे हें निर्विवाद सिद्ध होण्यास स्थितप्रज्ञाच्या वर्णनाचे वगैरे जें दोहींमधील सादृश्य वर दाखविलें त्याखेरीज बौद्ध ग्रंथांत दुसरें कांहीं साधन मिळतें कीं नाहीं याचा आतां विचार करूं. बौद्ध धर्माचे मूळचे स्वरूप शुद्ध निरात्मवादी व निवृतिपर असें सांगितलें आहे. पण त्याचे हें स्वरूप फार दिवस टिकलें नाहीं. भिक्षूच्या आचारासबंधानें मतभेद पडून बुद्धाच्या मरणानंतर त्यांत अनेक उपपंथ निर्माण होऊं लागले इतकेंच नव्हे, तर धार्मिक तत्त्वज्ञानाबद्दलहि अशाच प्रकारचा मतभेद उत्पन्न झाला. अलीकड तर कित्यक अशीहि कोटि करूं लागले आहेत कीं, आत्मा नाहीं म्हणण्यांत “आचिंत्य आत्मज्ञानाच्या शुष्कवादांत न पडतां वैराग्यानें व अभ्यासानें मन निष्काम करण्याच्या उद्योगास लागा; आत्मा असो, वा नसो, मनोनिग्रहाचे काम मुख्य असून तें सिद्ध करून घेण्याचा प्रयत्न प्रथम करून घेतला पाहिजे,”-एवढेच बुद्धाच्या मनांतून सांगावयाचे आहे, ब्रह्म किंवा आत्मा मुळीच नाही असें म्हणण्याचा त्याचा हेतु नाही. कारण, तेविज्जसुतांत खुद्द बुद्धानेंच ‘ब्रह्मसहव्यताय’ स्थितीचा उल्लेख केला असून सलसुतांत व थेरगाथेतहि “मी ब्रह्मभूत आहे” असें त्यानें आपलें वर्णन केले आहे (सेलसु.१४; थेरगा. ८३१ पहा). पण ही कोटि जरी खरी मानिला तरी त्यांतूनच ‘आत्मा किंवा ब्रह्म यांपैकी कोणतीच नित्य वस्तु जगाच्या बुडाशीं नाहीं, जें कांहीं दिसतेंते क्षणिक किंवा शून्य आहे,” अथवा “जें कांहीं दिसतें तें ज्ञान आहे, ज्ञानाखेरीज या जगांत दुसरें कांहीं नाहीं”इत्यादि तत्त्वझानदृष्टया अनेक प्रकारची मतें, वाद, किंवा आग्रही पंथ पुढे निर्माण झाले, ही गोष्ट निर्विवाद आहे (वे. सू.शांभा.२.२.१८-२६ पहा). या निरीश्वर किंवा अनात्मवादी बौद्ध मतांसचक्षणिकवाद, शून्यवाद आणि विज्ञानवाद असे म्हणतात. पण या सर्व पंथांचा येथे विचार करण्याचे आपणास कांहीं कारण नाहीं. आपला प्रश्न ऐतिहासिक आहे. म्हणून त्याचा निकाल होण्यास अवश्य तेवढी, म्हणजे ‘महायान' नांवाच्या एकाच पंथाची हकीकत येथे थोडक्यांत सांगतों. बुद्धाच्या मूळ उपदेशांत आत्मा अगर ब्रह्म (अर्थात्परमात्मा किंवा परमेश्वर) यांचे अस्तित्वच नोತ್ಗ भक्तानें परमेश्वरप्राप्ति करून घेण्याचा खुद्द बुद्धानेंच आपल्या हयातीत उपदेशिला जाणें शक्य नव्हतें; आणि त्याची