पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५७२ गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट श्रमांत पूर्ण मोक्षप्राप्ति कधीच होत नाहीं हें वैदिक धर्मात प्रथम कांहीं उपनिषत्कारानीं प्रतिपादिलेलें मतहि बुद्धानें स्वीकारिलें आहे. उदाहरणार्थ, सुत्तनिपातापैकी धम्मिकसुतांत उपासक व भिक्षु यांची तुलना करून, गृहस्थास उत्तम शिलानें फार झालें तर ‘स्वयंप्रकाश' देवलोकांची प्राप्ति होईल, पणे जन्ममरणाच्या चक्रांतून कायमची सुटका होण्यास संसार व बायकामुलें यांचा त्याग करून त्यानें अखेर मिक्षुधर्मचस्वीकारिला पाहिजे, असेंबुद्धानें स्पष्ट म्हटले आहे(धम्मिकसुत.१७,२९; आणि बृ.४.४.६ व मभा.वन.२.६३पहा). कर्ममागीय वैदिक ब्राह्मणांशीं वाद करितांना आपलें हें संन्यासपर मत सिद्ध करण्यास “तुमच्या ब्रह्मास जर बायकामुलें अगर रागलोभ नाहीं तर बायकामुलांत राहून व यज्ञयागादि काम्य कर्मे करून तुम्हांस ब्रह्मप्राप्ति कशी होणार?” अशा तन्हेचा युक्तिवाद बुद्ध करीत असे असेंतेविजसुतांत वर्णन आहे (ते सु.१.३५;३.५); व खुद्द बुद्धानें स्वतः तरुणपणींच बायकेो मुलगा व राज्य सोडून देऊन भिक्षुधर्म अंगीकारिल्यावर सहा वर्षानीं त्याला बुद्धावस्था प्राप्त झाली, ही गोष्ट प्रसिद्ध आह. बुद्धाशीं समकालीन पण त्याच्या आधीं समाधिस्त झालेल्या महावीर नावाच्या शवटच्या जैन तीर्थकाराचा उपदशहि अ· साच आहे. पण तो बुद्धाप्रमाणें अनात्मवादी नसून, वस्रप्रावरणादि ऐहिक सुखांचा त्याग करणे आणि आहंसाव्रत पाळणे हे धर्म जैन यति बौद्ध भिक्षूपेक्षां अधिक कडकडीत रीतीनें पाळीत असत, व अद्याप पाळितात हा या दोन धेर्मीमधील एक महत्त्वाचा भेद आहे. आपल्या खाण्यासाठी म्हणून मुद्दाम मारिलेले नाहीत अशा प्राण्यांचे ‘पवत'(सं.प्रवृत्त) म्ह० ‘तयार असलेलें मांस’ (हत्ती, सिंह वगैरे कांहीं प्राणी वज्र्य करून) बुद्ध स्वतः खात असून ‘पवत्त मांस व मासे खाण्याची बौद्ध भिक्षूंसहि त्यानें परवानगी दिली आहे; व वस्रांखेरीज नग्न हिंडणे हा गुन्हा होतो असा बौद्ध भिक्षुधर्मात नियम आहे (महावग्ग.६.३१.१४ व८.२८.१). सारांश, अनात्मवादी भिक्षु व्हा असा जरी बुद्धाचा निश्चित उपदेश होता, तरी कायक्लेशमय उग्र तप बुद्धाला संमत नसून (महावग्ग.५.१.१६ व गी. ६.१६), बौद्ध भिक्षूंच्या विहारांताल म्हणजे त्यांना रहाण्यासाठीं बांधिलेल्या मठांतील एकंदर व्यवस्थाहि शरीरास फार कष्ट न होतां प्राणायामादि योगाभ्यास आचरितां यावा अशा बताची असे. तथापि अर्हतावस्था किंवा निर्वाणसुख प्राप्त होण्यास गृहस्थाश्रम सोडिलाच पाहिजे, हें तत्त्व त्यांत पुरं कायम असल्यामुळे बौद्ध धर्म संन्यासपर आह. या म्हणण्यास त्यानें कांहं प्रत्यवाय येत नाहीं. ब्रह्मज्ञान किंवा आत्मानात्मविचार म्हणजे भ्रमाचे एक मोठे जाळे होय असे जरी बुद्धाचे ठाम मत होतें, तरी दुःखमय संसारचक्रांतून सुटका होऊन निरंतरची शांति व सुख मिळण या दृश्य कारणासाठीं वैराग्यानें मन ‘निर्विषय' करणें या