पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ६-गीता व बौद्ध ग्रंथ owsፃ धर्म उभारिलेला आहे, तरी केॉटसारख्या आधुनिक पाश्चिमात्य पंडितांच्या निव्वळ आधिभैतिक धर्माप्रमाणे--किंवा गीताधर्माप्रमाणेंहि-बौद्ध धर्म मूळांत प्रवृतिपर नाहीं हें लक्षांत ठेविलें पाहिजे. उपनिषदांतील आत्मज्ञानाची तात्त्विक ‘दृष्टि'बुद्धास मान्य नाहीं हें खरे; पण संसार अजीबात सोडून देऊन मन निर्विषय व निष्काम करणें हेंच काय तें मनुष्याचे या जगांतील परम कर्तव्य होय, हा बृहदारण्यकोपनिषदांतील याज्ञवल्क्याचा सिद्धान्त (बृ.४.४.६) बौद्धधर्मातहि सवस्वों कायम राखलेला असल्यामुळे, बौद्ध धर्म मूळांतकेवळ संन्यासूपर झाला आहे. संसार नसोडितां केवळ गृहस्थाश्रमांतच राहून, परमसुख अगर अर्हतावस्था कधींच शक्य नाहीं, हें बुद्धाच्या सर्व उपदशांचे तात्पर्य होय. तथापेि गार्हस्थ्यवृत्तीचे त्यांत अगदींच विवेचन नाही असें नाहीं. भिक्षु न होतां, बुद्ध, त्याचा धर्भ, आणि बौद्ध भिक्षूचे संघ म्हणजे मेळे किंवा मंडळ्या, या तिघांवर विश्वास ठेवून “बुद्धं शरणं गच्छामे, घेर्ग् शरणं गच्छामि, संर्घ शरणं गच्छाम,” या संकल्पोञ्चारणानें या तिघांस शरण जाणाच्या लोकांस बौद्ध ग्रंथांत उपासक अशी संज्ञा आहे. हेच बौद्धधमीं गृहस्थ म्हणावयाचे; व या उपासकांनी आपली गार्हस्थ्यवृतेि कशी चालवावी याबद्दल प्रसंगोपात खुद्द बुद्धानेंहि कूांही ठिकाणीं उपदशकेलेला आह (महापरिनिब्बाणसुत.१.२४). क गार्हस्थ्यधर्मापैकीं हिंसात्मक श्रौत यज्ञयाग व चातुर्वण्र्यभेद् बुद्धास मान्य नव्हता. या गोष्टी सोडून दिल्यावर स्मार्त पंचमहायज्ञ, दानादि परोपकारक धर्म आणि नीतीनें वागणे एवढेच काय तें गृहस्थाचें कर्तव्य शिल्लक रहातें; आणि गृहस्थधर्म वर्णन करितांना एवढ्या गोष्टींचाच बौद्ध धर्मग्रंथांत उल्लेख असतो. पंचमहायज्ञ प्रत्येक गृहस्थानें म्हणजे उपासकानें आचरावे असें बुद्धानें म्हटलें असून, अहिंसा, सत्य, अस्तेय, सर्वभूतानुकंपा आणि (आत्मा मान्य नसला तरी) आत्मौपम्यदृष्टि, शौच किंवा मन:पूतता, आणि विशेषेकरून सत्पात्री म्हणजे बौद्ध भिक्षूस किंवा बौद्ध भिक्षुसंघास अन्नवस्रादि दान करणे, वगैरे नीतिधर्महि बौद्ध उपासकानें पाळिले पाहिजेत असें बुद्धाचे स्पष्ट सांगणे आहे. बौद्ध धर्मात यास ‘शील' अशी संज्ञा असून पंचमहायज्ञांप्रमाणे हे नीतिधर्महि ब्राह्मणधर्मातील धर्मसूत्रे किंवा प्राचीन स्मृतिग्रंथू (मनु. ६.९९ व १० ६३ पहा) यांतून बुद्धानें घेतले आहेत असें दोहोंच्या तुलनेवरून स्पष्ट होतें.* किंबहुना या ओचारासंबंधानें जुन्या ब्राह्मणांची स्वतः बुद्धानेंच ब्राह्मणधम्मिकसुतांत स्तुात केली आहे, आणि मनुस्मृतींतले कांहीं लोक तर धम्मपदांत अक्षरशः आलेले आहेत (मनु. २.१२१ व •.४५ आणि धम्मपद १०९ व १३१ पहृा). पण पंचमहायज्ञ व नीतिधर्म एवढ्याच गोष्टी वैदिक ग्रंथांतून बौद्ध धर्मात घेतल्या आहेत असें नाहीं. गृहस्था

  • See Dr. Kern's Manual of Buddhism (Grundriss III.8)p 68.