पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

o गीतारहरूय अथवा कर्मयोग-परिशिष्ट واما ‘ब्रह्मसैस्था,’‘ब्रह्मभूतता,’‘ब्रह्मनिर्वाणं’ (गी.५.१ \زجاجة سه و **** म्हणजे ब्रह्मांत आत्म्याचा लय करणें, अशीं शेवटच्या आधाराचीं दर्शक नांवें देतात; आणि बुद्ध तिला फक्त “निर्वाण' म्हणजे “विराम पावणें, किंवा दिवा विझतो त्याप्रमाणें वासनेचा नाश होणें” असें केवळ क्रियादर्शक नांव देतें, असा या दोन धर्मात भद आहे. कारण, ब्रह्म किंवा आत्मा भ्रम म्हटल्यावर “विराम कोण व कशांत पावते” हा प्रश्नच शिल्लक रहात नाहीं (सुतनिपातापैकीं रतनसुत १४ व वैगीससुत १२ व १३ पहा); व शहाण्या पुरुषानें या गूढ प्रश्नाचा विचार करीत बसूहि नये, असें बुद्धानें स्पष्ट म्हटलें आह (सब्बासवसुत९-१३ व मिलिंदप्रश्न४२. ४ व ५पहा) ही स्थिति प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म नसल्यामुळे, एका देहाचा नाश होऊन पुनः दुसरा देह प्राप्त होणें या सामान्य क्रियेस लागणारा ‘मरण' हा शब्द बौद्ध धर्माप्रमाणेंहि ‘निर्वाणास' लावितां येत नाहीं. निर्वाण हें ‘मरणाचे मरण’ किंवा उपनिषदांत वर्णिल्याप्रमाणें ‘मृत्यु तरून जाण्याचा मागै’ आहे, नुसतें मरण नव्हे. कोणताहि मनुष्य या स्थितीस पोंचला म्हणजे सापाला ज्याप्रमाणे त्यानें टाकून दिलल्या आपल्या कातेची पर्वा नसत्ये तद्वत् या स्थितीस पोचलेला मनुष्य आपल्या शरीराची फिकीर करीत नाही असा बृहदारण्यकोपनिषदांत (४.४.७) जो दृष्टान्त आहे तोच खच्या बौद्ध भिक्षूचे वर्णन करितांना सुतनिपातांतील उरगसुताच्या प्रत्येक लोकांत घेतला आहे; व आत्मनिष्ठ पुरुष पापपुण्यापासून नेहमीच अलिप्त असल्यामुळे (बृ. ४.४.२३) मातृवध किंवा पितृवध यांसारख्या पातकाचाहेि त्यास दोष लागत नाहीं हें तत्त्वहि (कौर्षा. ब्रा. ३. १), धम्मपदांत शब्दशः जसेंच्या तसेंच सांगितलें आहे ( धम्म. २९४ व २९५ आणि मिलिंदप्रश्न. ४. ५. ७ पहा). सारांश ब्रह्माचे व आत्म्याचें आस्तित्व बुद्धाला जरी कबूल नव्हतें, तरी मन शान्त, विरक्त व निष्काम करणें इत्यादि मोक्षप्राप्तीचीं जीं साधनें उपनिषदांतून वर्णिलीं आहत, तीच साधनें बुद्धाच्या मतें निर्वाणप्रांप्तीसहि जरूर असल्यामुळे, बौद्ध यति व वैदिक संन्यासी यांचीं वर्णनें मानसिक स्थितीच्या दृष्टीनें एकसारखींच होतात; आणि त्यामुळे पापूपुण्याच्या जबाबदारीसंबंधाचे किंवा जन्ममरणाचूयाफेच्यांतून सुटका होण्याबद्दलचे वैदिक संन्यासधर्मातील सिद्धान्तच बौद्ध धर्मातहि कायमे रहूातात. पण वैदिकधर्म गौतमबुद्धापूर्वीचा असल्यामुळे हे विचार मूळचे वैदिकधमातलेच आहत याबद्दल कांहीं शंका नाहीं. वैदिक व बौद्ध संन्यासधर्मौत भेदाभेद कोणत ते सांगितले. आतां गार्हस्थ्यधर्मासंबंधानें बुद्धाचे काय म्हणणे आहेतें पाहूं. आत्मानात्मविचाराच्या तत्त्वज्ञानाला महत्त्व नदेतां सांसारिक दुःखाचे अस्तित्व वगैरे दृश्य पायावरच जरी बौद्ध