पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

o गीतारहस्य अथवा कमयोग ,ما fلا असा पांचव्या अध्यायाचे आरंभीं त्यानें प्रश्न केला आहे; व दोन्ही मार्ग जरी निःश्रेयसकर म्हणजे एकसारखेच मोक्षप्रद आहेत तरी त्यांतले त्यांत कर्मयोगाची मातब्बरी आधक होय-‘‘कर्मयोगो विशिष्यते”-असें आतां भगवंतांनीं स्वच्छ सांगून अर्जुनाचा संदेह दूर केला आहे (५.२). याच सिद्धान्ताच्या दृढीकरणार्थ भगवान् आणखी असें सांगेतात कीं, संन्यास किंवा सांख्य निछेनें जो मोक्ष मिळती तोच कर्मयोगानेंहि मिळतो इतकेंच नव्हे, तर कर्मयोगांत जी निष्कामबुद्धि सांगितली ती प्राप्त झाल्याखेरीज संन्यास सिद्ध होत नाहीं; आणि ती प्राप्त झाल्यावर योगमार्गानें कर्म करीत असूनहि ब्रह्मप्राप्त झाल्याखेरीज रहात नाही. मग सांख्य आणि योग हे भिन्न आहत असें बंड माजविण्यांत काय हांशील ? चालणे, बोलणे, पहाणे, ऐकणे, वास घेणें, इत्यादि शेंकडों कर्म सोडूं म्हटलें तरीहि जर सुटत नाहीत, तर कर्म सोडण्याच्या भरीस न पडतां तीच ब्रह्मार्पणबुद्धीनें करणे हाच शहाणपणाचा मार्ग होय. म्हणून तत्त्वज्ञानी पुरुष निष्काम बुद्धनेिं कमें करीत राहुन त्यानेंच अखेर शातेि व मोक्ष यांची प्राप्ति करून घेत असतात. ईश्वर तुम्हांला कर्मे करा म्हणून सांगत नाही आणि सोडा असेंहि म्हणत नाहीं. हा सर्व प्रकृतीचा खेळ आहे; ओणि बंधन हा धर्म मनाचा असल्यामुळे समबुद्धि केिवा सर्वभूतात्मभूतात्मा' होऊन जो कर्म करितो त्याला त्यांची बाधा होत नाहीं. किंबहुना कुत्रा, चांडाल, ब्राह्मण, गाय, हत्ती यांच्या ठिकाणी ज्याची बुद्धिं सम झाली, व सर्वभूतान्तर्गत आत्मैक्य ओळखून जो आपले व्यवहार करूं लागला त्याला बसल्या जागींच ब्रह्मनिर्वाणरूपी मोक्ष मिळतो,मोक्षप्राप्तीसाठी त्याला दुसरे कोटें जावें लागत नाहीं, अगर साधनहि पहावयास नकी, तो सदा मुक्तच असतो, असें या अध्यायाच्या अखेर म्हटले आहे. सहाव्या अध्यायांत हाच विषय पुढे चालू असून कर्मयोग सिद्ध होण्यास लागणारी समबुद्धि संपादन करण्यास उपाय कोणता तें सांगितले आहे. पहिल्याच श्वलोकांत कर्मफलाची आशा न ठेवितां कर्तव्य म्हणून प्राप्त झालेलीं कर्मे जेो करितो तोच खरा योगी व खरा संन्यासी, आग्नहोत्रादि कर्मे सोडून स्वस्थ बसलेला खरा संन्यासी नव्हे, असें भगवंतांनी आपलें मत स्पष्ट सांगून नंतर कर्मयेागांत बुद्धि स्थिर करण्यास इंद्रियनिग्रहरूपीो जें कर्म करावें लागतें तें आपलें आपण होऊनच केलें पाहिजे,तसें न केल्यास त्याचा दोष दुसच्याला लावितां येत नाहीं असें आत्मस्वातंत्र्याचे वर्णन केले आहे; आणि पुढे इंद्रियनिग्रहरूप योग कसा साधावा याचे पातंजलयोगदृष्टया या अध्यायांत मुख्यत्वेंकरून वर्णन आहे. तथापि यमनियमासनप्राणायामादि साधनांनीं ईद्रियांचा निग्रह केला तरी तेवढ्यानेंच काम भागत नसून पुढे त्या पुरुषाची वृात “सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनेि” किंवा