पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ६-गीता व बौद्ध ग्रंथ • ५६ • भारा ६-गीता व बौद्ध ग्रंथ. हल्लींच्या गीतेचा काल ठरविण्यास वर जो बौद्ध ग्रंथांचा पुरावा दाखल केला आहे, त्याचे पुरें महत्त्व लक्षांत येण्यास गीता आणि बौद्ध ग्रंथ किंवा बौद्ध धर्म यांच्यामधील सामान्य सादृश्यवैदृश्याचाहि या ठिकाणीं थोडा विचार करणे जरूर आहे. गीतेंतील स्थितप्रज्ञ प्रवृत्तिमार्गातला असतेो हा गीताधर्माचा विशेष होय असें पूर्वी अनेक वेळां सांगितले आहे. पण हा विशेष गुण क्षणभर बाजूला ठेवून, अशा पुरुषाच्या मानसिक व नैतिक गुणांचाच फक्त विचार केला तर गीतेंत स्थितप्रज्ञाची (गी.२.५५-७२), ब्रह्मनिष्ठ पुरुषाचीं(४.१९-२३;५.१८-२८) व भक्तियोग्याचीं (१२.१३-१९)जीं लक्षणें सांगितली आहेत त्यात, आणि निर्वाणपदास आधिकारी झालेल्या अर्हतांची म्हणजे पूर्णीवस्थेस पोचलेल्या बौद्ध भिक्षूचीं निरानराळया बौद्ध ग्रंथांत जीं लक्षणें दिलेली आहेत त्यांत विलक्षण साम्य आहे असे दिसून येतें (धम्मपद श्लो. ३६०-४२३ व सुत्तनिपातापैकीं मुनिसुत व धम्मिकसुत्त पहा). किंबहुना स्थितप्रज्ञ किंवा भक्तिमान् पुरुषाप्रमार्णच खरा भिक्षुद्दि ‘शांत,’ ‘निष्कामे,’ ‘निर्मम,’ ‘निराशी,’ (निरिस्सित), ‘समदुःखसुख,’ ‘निरारंभ,’ ‘अनिकेतन' किंवा ‘अनिवेशन’ अथवा ‘समनिंदास्तुति,' ‘मानापमान व लाभालाभ सम मानणारा’ असतो असें या वर्णनांतून कांहीं शब्दसाम्यहि आढळून येतें (धम्मपद ४०,४१ व ९१: सुतनि. मुनिसुत. १.७ व १४; द्वयतानुपस्सनसुत २१-२३; व विनयपिटक चुल्लवग्ग. ७.४.७ पहा). ज्ञानी पुरुषास जो उजेड तोच अज्ञानाचा अंधकार-“या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी” (गी. २.६९)-हा विचार द्वयतानुपस्सनमुताच्या ४० व्या श्वलोकांत, आणि“अरेासनथ्यो न रोसेति”-म्हणजे स्वतः त्रासला जात नाहीं व लोकांनाहि त्रासवात नाहीं-असें गीतेंतील “यस्मान्नेद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः” (गी. १२.१५) या वर्णनाशीं सदृश वर्णनहि मुनिसुताच्या १० व्या श्वलोकांत आलेलें आहे. तसेंच सल्लसुतांत “जें कांहीं जन्मलें तें मरणशाली आहे,” किंवा “भूतांचा आदि अगर अंत अव्यक्त असल्यामुळे त्याचा शोक करणें व्यर्थ होय” (सल्लेसुत १ व ९ आणि गी. २.२७व२८) इत्यादि गीतेंतलेच विचार थोड्या शब्दभदानें आढछून यतात; आणि गीतेच्या दहाव्या अध्यायांत किंवा अनुगीतेंत (मभा.अश्व.४३, ४४) “ज्योतिष्मानांपैकी सूर्य, नक्षत्रांपैकीं चंद्र, वेदमंत्रांत गायत्री” इत्यादि जें वर्णन आहतेंच हुबेहुब सेलसुताच्या २१,२२ या लोकांत आणि महावग्ग६.३५. ८ यांत आलेल असून दुसरीहि बरीच किरकोळ शब्दसादृश्ये व अर्थसादृश्यें कै. तेलंग यांनीं गीतेच्या आपल्या ईग्रजी भाषांतरास जोडिलेल्या टीपांतून दाखविलीं आहेत. तथापि ही सादृश्यें कां उत्पन्न झालीं ? किंवा हे विचार मूळचे बौद्धांचे