पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• भाग ५-हरुलींच्या गीतेचा काल ५६ १ असें कित्येक मानितात. हें दुसरें म्हणणें खरें धरिलें तरीहि भासापूर्वी निदान शेंदोनशें वर्ष म्हणजे शककालारंभीं महाभारत व गीता हे सर्वमान्य झालेले ग्रंथ होते असें वरील प्रमाणावरून सिद्ध होतें. (६) परंतु याहिपेक्षां या प्रकारचे, म्हणजे जुन्या ग्रंथकारांनी गीतेंतील लोक घेतल्याचे, बलवत्तर प्रमाण कै. त्र्यंबक गुरुनाथ काळे यांनी गुरुकुलाच्या ‘वैदिक मॅगझिन' नामक इंग्रजी मासिक पुस्तकांत (पुस्तक ७. अंक ६॥७.पृ. ५२८-५३२, मार्गशीर्ष व पौष, संवत् १९७०) प्रसिद्ध केले आहे. यापूर्वी पाश्चिमात्य संस्कृतज्ञ पंडितांची अशी समजूत होती कीं, गीतेचा उल्लेख संस्कृत काव्यं किंवा पुराणे यांपेक्षां प्राचीन अशा कोणत्याच ग्रंथांत, उदाहरणार्थ सूत्रग्रंथांतहि, सांपडत नाहीं; व त्यामुळे सूत्रकाल संपल्यानंतर म्हणजे फार झाले तर इसवी सनापूर्वी दुस-या शतकांत गीता झाली असावी असें म्हटले पाहिजे. परंतु कै. काळे यांनी ही समजूत चुकीची आहे असें दाखविले आहे. बौधायनगृह्यशेषसूत्रांत (२.२२.९)६शाभावे द्रव्याभ वे साधारणे कुर्यान्मनसा वार्चयेादति । तदाह भगवान्– पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । तदं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मन: ॥ इति असा गीतेंतील (९.२६) श्वठीक “यथाह भगवान्’ म्हणून स्पष्ट घेतला आहे; व पुढे, भाक्तनम्र होऊन हे मंत्र म्हणावे-भक्तिनम्रः एतान् मंत्रानधीयीत-असें म्हटले आहे. आणि याच गृह्यशषसूत्राच्या तिसच्या प्रश्नाच्या अखेरीस“ॐनमो भगवते वासुदेवाय” हा द्वादशाक्षर मंत्र जपला म्हणजे अश्वमेधफल मिळतें असें म्हटले आहे. यावरून बौधायनाच्या पूर्व गीता प्रचलित असून वासुदेवपूजाहि सर्वमान्य झालेली होती असें पूर्ण सिद्ध होतें. याशिवाय बौधायनाच्या पितृमेधसूत्रांत तृतीय प्रश्नाच्या आरंभींच- حسی जातस्य वै मनुष्यस्य् ध्रुवं मर्णमेिति विजानीयात्तस्माजते न . प्रहृष्येन्मृते च न विषीदेत् । असॆ वाक्य अहि, व् तॆ ‘‘जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य ‘व । तस्माद्परिहार्थऽथं न त्वं शोचितुमर्हसि” या गीतेंतील लोकावरून सुचलेले असावें, असें सहज दिसून येतं; आणि त्याच्या भरतीस वरील “पत्रं पुष्पं०” हा लोक घृतला म्हणजे तर काहींच शंका रहृत नाहीं. खुद्द महाभारतांतील एक श्लोक बौधायनसूत्रांत सांपडतो हें वर सांगितलेंच आहे. बोधायनाचा काल आपस्तंबापूर्वी शेंदोनशें वर्ष असून आपस्तंबाचा काल ख्रिस्तापूर्वी तीन शतकांहून अलीकडे नसावा असें बुहुरसहेिवांनी ठरविलें आह.* पण आमच्या मतें तो किंचित

  • See Sacred Books ot le rast. Sei es, Vol. 1. In ro. P• xliii. and also the same Series, Vol XIV. Intro. p. xliii.

गी. र. ३६