पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीताध्यायसंगति *** विवस्वानाचे आधीं तुम्ही कोठून येणार असा अर्जुनानें प्रश्न केला. तेव्हां त्या प्रश्नास उत्तर देतांना साधूंचे संरक्षण, दुष्टांचा नाश आणि धर्माची स्थापना करणे असें आपल्या अनेक अवतारांचे प्रयोजन सांगून, याप्रमाणे हें लोकसंग्रहकारक कर्म मी करीत असतांहि माझी त्या ठिकाणी आसक्ति नसल्यामुळे मला त्याचे पापपुण्यादि फल लागत नाही असें कर्मयोगाचे समर्थन केल्यावर, आचरणाचे हें तत्त्व जाणूनच जनकादिकांनीं पूर्वी कर्म केली व तूंहि तसेंच कर असा अजुनास भगवंतांनीं पुनः उपदेश केला आहे. तिसच्या अध्यायांत “यज्ञाकरितां केलेले कर्म बंधक होत नाहीं” असा जो मीमांसकांचा सिद्धान्त सांगितला होता, तोच आतां पुनः सांगून केवळ तीळतांदूळ जाळणे किंवा पशु मारणे हा एक प्रकारचा यज्ञ खरा, पण हा द्रव्यमय यज्ञ हलक्या प्रतीचा आणेि संयभार्मीत कामक्रोधादिक इंद्रियवृात जाळणे किंवा ‘न मम' म्हणून सर्व कर्माची ब्रह्मांत आहुति देणे हे यज्ञ वरच्या पायरचेि अशी यज्ञाची विस्तृत व व्यापक व्याख्या करून या यज्ञासाठी फलाशा सोडून कर्मे करावीं असा आतां बोध केला आहे. कारण, मीमांसकांच्या न्यायाप्रमाणे यज्ञार्थ केलेलीं कर्मे जरी स्वतंत्ररीत्या बंधक नसली तरी यज्ञाचे म्हणून जें फल आहे तें मिळाल्याखेरीज रहात नाही. म्हणून् यज्ञहि निष्काम बुद्धीनें केला म्हणजे युज्ञार्थ केलेलें कर्म आणि खुद्द यज्ञ मिळून दोन्ही बंधकू होत नाहीत. शेवटीं सर्वभूतें आपल्या ठायीं किंवा भगवंतांचे टायीं आहेत असें जे ज्ञान तिचेच नांव साम्यबुद्धि. आणि हें ज्ञान झालें म्हणजे सर्व कर्म भस्म होऊन त्यांची बाधा कत्यसि होत नाहीं; ‘‘सर्वे कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते”-सर्व कर्म ज्ञानात लय् पावतें;कर्मे स्वतः बंधक नसून अज्ञानानें बंध उत्पन्न होतो; यासाठीं अज्ञान सोडून दे, व कर्मयेोगाचा आश्रय करून लढाइला उभा रहा;-असें सागून हा अध्याय पुरा केला आहे. सारांश, कर्मयोगमागाच्या सिद्धयर्थहि साम्यबुद्धिरूप ज्ञान असणें जरूर आहे अशी या अध्यायांत आतां ज्ञानाची प्रस्तावना झाली आहे. कर्मयोगाची अवश्यकता म्हणजे कमें कां केलीं पाहिजेत यांचीं कारणे तिसच्या व चवथ्या अध्यायांत सांगितलीं खरी; परंतु दुसच्याच अध्यायांत सांख्यज्ञान सांगून नंतर कर्मयोगाचे विवेचनांतहि कर्मापेक्षां बुद्धि श्रेष्ठ, असें वारंवार सांगण्यांत आल्यामुळे, या दोन मागोंपैकीं श्रेष्ठ मार्ग कोणता हें सांगणें आतां जरूर आहे. कारण, दोन्ही मार्ग सारख्याच योग्यतेचे म्हटल्यास यांपैकीं ज्याला जो मार्ग बरा वाटेल तो त्यानें स्वीकारावा, कर्मयोगच स्वीकारण्याचे कारण नाहीं असे प्राप्त होतें. अर्जुनाच्या मनांत हीच शंका येऊन “सांख्य व योग अशा दोन्ही निष्ठा मला सरमिसळ करून न सांगतां या दोहींपैकीं श्रेष्ठ मार्ग कोणता तेवढे एकच निश्चयात्मक आतां मला सांगा म्हणजे त्याप्रमाणे वागण्यास मला सोईचे पडेल.” गी. र. २९