पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५५६ गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट श्वलोकावरून बौधायनाच्या पूर्वी महाभारत होतें असें पकें अनुमान होत नाहीं असें बुल्हरसाहेब म्हणतात.* पण ही शंका बरोबर नाहीं. कारण, बौधायनाच्या गृह्यशेषसूत्रांत विष्णुसहस्रनामाचा उल्लेख असून (बौ. गृ.शे.१.२२.८), शिवाय त्याच सूत्रांत (२.२२.९) पुढे गीतेतला “पत्रं पुष्पं फलं तोयं०” हा »ठोक (गी.९.२६) आलेला अोह. बौधायनसूत्रांतील हे उल्लेख प्रथम कै. त्र्यंबक गुरुनाथ काळे यांनी प्रसिद्ध केले; व त्यांवरून वुल्हरसाहेबांची शंका निर्मूल असून आश्वलायन व बौधायन या दोघांसहि महाभारत माहीत होतें असें म्हणावें लागतें. बौधायन इसवी सनापूर्वी सुमारें चारशें वर्ष झाला असावा असे बुल्हर यानेंच अन्य प्रकरणांवरून निश्चित केले आहे. (६)खुद्द महाभारतांत जेथें विष्णूच्या अवतारांचे वर्णन आहे तेथे त्यांत बुद्धाचे नांव नाहीं; आणि नारायणीयोपाख्यानांत (मभा. शां.३३९ १००)जेथे दहा अवतारांचीं नांवें आहंत तेथें हंस हा प्रथम अवतार धरून कृष्णानंतर एकदम कल्कि घालून दहांची बेरीज केली आहे. तथापि वनपर्वात कलियुगाच्या भविष्यत् स्थितीचे वर्णन चालू असतां, एडूकचिह्वा पृथिवी नदेवगृहभूषिता”-म्हणजे पृथ्वीवरदेवूळांच्याऐवजी एडूक होतील, असें वर्णन आह (मभा. वन.१९.० ६८) एडूक म्हणजे बुद्धाचा कॅस, दांत वगैरे कांहं स्मारक पुरून त्यावर उभारलेला खांब, मनोरा किंवा इमारत होय; व यास हल्लीं ‘डागोबा’ असें म्हणतात. डागोबा हा शब्द संस्कृत ‘धातुगर्भ’ (=पाली डागूब) याचा अपभ्रंश असून ‘धातु’ म्हणजे ‘आंत ठेविलेली स्मारकवस्तु’ असा अर्थ आहे. सिलोन व ब्रह्मदेश यांमध्यें असले डागीबा जागोजाग आहत. यावरून वुद्ध झाल्यानंतर परंतु त्याची गणना अवतारांत होण्यापूर्वी महाभारत झाले असावें असें दिसून येतें. महाभारतांत बुद्ध आणि प्रतिबुद्ध असे शब्दं अनेक ठिकाणीं आले आहेत (शां. १९४.५८; ३०७ ४७; ३४३.५२). पण यांचा अर्थ ज्ञानी, जाणता किवा स्थितप्रज्ञ पुरुष एवढाच तेथें उद्दिष्ट आहे. बौद्ध धर्मांतून तो शब्द घेतलेला दिसत नाहीं; किंबहुना बौद्धांनीच हे शब्द वैदिक धर्मातून घेतले असावे जसें मानण्यास सबळ कारण आहे. (७) महाभारतांत नक्षत्रगणना अश्विन्यादि नसून कृतिकादि आहे (मभा. अनु. ६४ व ८९), आणि मष-वृषभादि राशींचा कोटेंच उल्लेख नाही, ही गोष्ट कालनिर्णयदृष्टया अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ग्रीक लोकांच्या सहवासानें मेष-वृषमादि राशि हिंदुस्थानांत येण्यापूर्वी म्हणजे अलेक्झांडरच्या पूर्व महाभारत

  • See sacred Books of the Est Series. Vol XIV intro p. xli.

fo. 2 #####4 #13 afar ałgora The Vedic Magazine and GuruХula Sarracha, Vol. V11. Nos. 6,7 pp. 628-582 मध्ये छापिला आहे, यांत लेखकाचे नांव प्रो. काळे असे दिलें आहे ते चूकं आहे