पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४४ गोतारहरय अथवा कर्मयोग-पाराशष्ट सनापूर्वी सुमारें १४००वर्षे पांडव व भारती युद्धझाले असावें असें या विद्वानांनी आतां ठरविलें आहे. अर्थात् श्रीकृष्णाचाहेि हाच काल होय; आणि हा काल स्वीकारिला म्हणजे श्रीकृष्णांनी भागवतधर्म ख्रिस्तापूर्वी निदान १४०० वर्षे म्हणजे बुद्धापूर्वी सुमारें ८०० वर्ष प्रवृत्त केला असावा असें प्राप्त होतें. कित्येकांचा यावर असा आक्षप आहे का, श्रीकृष्ण व पांडव हे जरी ऐतिहासिक पुरुष असल तरी श्रीकृष्ण या एका क्षत्रिय योद्धयास प्रथम एका महापुरुषाचे, नतर विष्णूचे, आणि क्रमाक्रमानें अखेर पूर्ण परत्रह्माचे रूप ब्राह्मणांनी देईपर्यंत दरम्यान पुष्कळ काळ लोटला असावा, व त्यामुळे भागवतधर्माच्या उदयाचा व भारती युद्धाचा काळ एक मानितां येत नाही. पण या म्हणण्यांत कांहीं अर्थ दिसत नाहीं. कोणाला देव मानावें व कोणाला देव मानू नये याबद्दलची आधुनिक तार्किकांचा समजूत आणि दोनचार हजार वर्षाच्या पूर्वीच्या लोकांची समजूत (गी.१०.४१) यांत महदंतर पडलेले आहे; आणि ज्ञानी पुरुष स्वतःच ब्रह्ममय होतो असा श्रीकृष्णापूर्वीच्या उपनिषदांत सिद्धान्त केलेला असून (बृ. ४.४.६), मैत्र्युपनिषदांत रुद्र, विष्णु, अच्युत नारायण, हे सर्व ब्रह्मच अहित (मैत्र्यु.७.७), असें स्वच्छ म्हटलें आहे. मग श्रीकृषणास परत्रह्मत्व येण्यास वेळ लागण्याचे कारण काय ? इतिहासाकडे पाहिले तरी बुद्ध आपल्या स्वत:ला ‘ब्रह्मभूत' (सेलसुत.१४; थेरगाथा ८३१) म्हणत असून, त्याच्या हयातीतच त्यास देवाचा मान मिळू लागला होता, व त्याच्या मरणानंतर लवकरच त्यास ‘देवाधिदेवाचे' किंवा वैदिक धर्मातील परमात्म्याचे स्वरूप प्राप्त होऊन त्याची पूजाहिं सुरू झाली होती असें विश्वसनीय बौद्ध ग्रंथावरून दिसून येतें; आणि ख्रिस्ताची गोष्टहि तशीच आहे. बुद्ध व ख्रिस्त यांप्रमाणें श्रीकृष्ण संन्यासी नव्हते व भागवतधर्महिं निवृतिपर नाहीं हें खरें. पण तेवढयामुळे बौद्ध व ख्रिस्त धर्मांच्या मूळपुरुषाप्रमाणें भागवतधर्माच्याहि प्रवर्तकास पहिल्यापासूनच ब्रह्माचे किंवा देवाचे स्वरूप प्राप्त होण्यास कोणतीच हरकत येण्याचे कारण नाहीं. श्रीकृष्णाचा काल याप्रमाणे निश्चित केल्यावर भागवतधर्माच्या उद्याचाहि तोच काल मानणें प्रशस्त व सयुक्तिक असतां, पाश्चिमात्य पंडित तसें करण्यास सामान्यतः कां कचरतात यांतील बीज निराळेच आहे. खुद्द ऋग्वेदाचाच काल ख्रिस्तापूर्वी सुमारें १५००किंवा फार झालेतर२०००वर्षापेक्षां अधिक प्राचीन नाहीं, अशी या पंडितांपैकीं पुष्कळांची अद्यापहि समजूत आहे. म्हणून भक्तिपर भागवतधर्म ख्रिस्तापूर्वी सुमारें १४०० वर्ष निघाला असेल हें म्हणणे त्यांच्या दृष्टीनें त्यांस अर्सभवनीय वाटतं. कारण, ऋग्वेदानंतर यज्ञयागादिक कर्मप्रतिपादक यजुर्वेद व ब्राह्मण ग्रंथ, नंतर ज्ञानपर उपनिषदें व सांख्यशास्र, आणि शेवटी भक्ति