पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* zー गीतारहस्य अथवा कर्मयोग-परेिशिष्ट पूर्ण निश्चयात्मक उत्तर जरी देतां आले नाही, तरी ठोकळ मानानें या कालाचा अजमास करणें कांहीं अशक्य नाही, असें पुढील विवेचनावरून दिसून येईल. श्रीकृष्णांनी अर्जुनास उपदेशिलेला भागवतधर्म तत्पूर्वी लुप्त झालेला होता. (गी.४.२) असें गीतेंत म्हटलें असून या धर्माच्या तत्त्वज्ञानांतं परमेश्वराला वासुदव, जीवाला संकर्षण, मनाला प्रद्युम्न व अहंकाराला अनिरुद्ध हीं नांवें दिलेली आहेत. पैकीं वासुदेव हें खुद्द श्रीकृष्णाचेच नांव असून संकर्षण हें त्याच्या वडील भावाचे म्हणज बलरामाचे आणि प्रद्युम्न व अनिरुद्धहीं नांवें श्रीकृष्णाचा पुत्र व पौत्र यांची आहत. याखेरीज सात्वत असें जें या धर्मास दुसरं नांव आहे तेंहि श्रीकृष्ण ज्या यादवज्ञातींत जन्मास आले त्या ज्ञातीचे आहे. यावरून श्रीकृष्ण ज्या कुळांत व ज्ञातीत जन्मले त्यांन हा धर्म प्रवृत्त झालेला असून, तेव्हांच श्रीकृष्णांनीं तो आपल्या प्रिय मित्रास म्हणजे अर्जुनास उपदेशिला असावा असें उघड होतें; व पौराणिक कथाहि तशीच आहे. शिवाय श्रीकृष्णाबरोबर सात्वतज्ञातचिाहि शेवट झाला अशी कथा असल्यामुळे श्रीकृष्णानंतर सात्वतज्ञातींत या धर्माचा प्रसार होणेहि शक्य नव्हतें. श्रीकृष्णांनी अशा रीतीनें जेो धर्म प्रवृत्त केला तो तत्पूर्वी कदाचित् नारायणीय किंवा पांचरात्र या नांवानें थोड्याबहुत अंशानें चालू असेल, आणि पुढे सात्वत ज्ञातींत त्याचा प्रसार झाल्यावर त्यास ‘सात्वत'हें नांव प्राप्त होऊन, नंतर भगवान् श्रीकृष्ण व अर्जुन हे नरनारायणाचेच अवतार होत या बुद्धीनें या धमौस ‘भागवतधर्म’ म्हणू लागले असतील, अशी या धर्माच्या निरनिराळ्या नांवांची एक प्रकारची ऐतिहासिक उपपात लावितां येईल; त्यासाठीं तीन किंवा चार निरनिराळे श्रीकृष्ण झाले असून त्यांपैकीं प्रत्येकानें त्यांत थोडीथोडी भर घातली असेल असें मानण्याचे कारण नाहीं, व मानण्यास पुरावाहि नाहीं. मूळ धर्मात घडत आलेल्या बच्यावाईट फरकावरून ही कल्पना बसवलेली आहे. पण बुद्ध, ख्रिस्त किंवा महंमद एक एक असतांहि त्यांच्या त्यांच्या धर्मातहि जर पुढे पुष्कळ बरेवाईट फरक झालेले आढळून येतात, तर मूळच्या भागवतधर्मास पुढे निरनिराळीं स्वरूपें प्राप्त झालों म्हणून, अगर श्रीकृष्णाबद्दल पुढे निरनिराळ्या कल्पना निघाल्या म्हणून तितके जानेवारीच्या अंकांत पृ. १७७ व १७८ यांत सांपडतील. डा. बुल्हर यांनींहेि असें म्हटलें also #f, “The ancient, Bhagavata Satvata or Pancharatra sect devoted to the worship of Narayana and his deified teacher Krishna-Devakiputra dates from a period long anterior to the rise of Jainas in the 8th Century B. C.”-Indian Antiguary Vol.XXIII. (1894) P.248. याबद्दलचे जास्त विवेचन पुढे याच परिशिष्टाच्या सहाव्या भागांत केलें आहे तें पहा.