पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४-भागवतधर्माचा उदय व गीता ५४१ नसून, पहिला अवतार हंस व पुढे कृष्णानतर एकदम कल्कि सांगितला आह (मभा. शां.३३९.१००) यावरूनहि नारायणीयाख्यान हें भागवतपुराण व नारदपंचरात्र यांहून प्राचीन आहे असें सिद्ध होतें. या नारायणीयाख्यानांत असें वर्णन आहे की, परब्रह्माचेच अवतार जे नर व नारायण नामक दोन ऋषि त्यांनीं नारायणीय म्हणजे भागवत धर्म मूळारंभों प्रवृत्त केला, व त्यांच्या सांगण्यावरून नारद ऋषि श्वेतद्वीपास गेल्यावर तेथे खुद्द भगवंतांनींच नारदास या धर्माचा प्रथम उपदेश केला; भगवान् ज्या श्वेतद्वीपांत रहातात तें द्वीप क्षीरसमुद्रांत असून क्षीरसमुद्र मेरुपर्वताच्या उत्तरेस आहे, इत्यादि नारायणीयाख्यानांतील वर्णन प्राचीन पौराणिक ब्रह्मांडवर्णनास अनुसरून आहे, व त्याबद्दल आमच्याकडे कोणास कांहीं विशेष वाटत नाहीं. पण वेबर नांवाच्या पाश्चिमात्य संस्कृतज्ञ पंडितानें याच कथेचा विपयास करून अशी दीर्घ शंका काढिली होती की, भागवतधर्मातील भाक्ततत्त्व श्वेतद्वीपांतून म्हणजे हिंदुस्थानाबाहेरील कोणत्या तरी देशांतून हिंदुस्थानांत गेले आह, आणि भक्तीचे हें तत्त्व तत्कालीं ख्रिस्ती धर्माखेरीज दुसरीकडे ज्या अर्थी प्रचारांत नव्हतें त्या अर्थी ख्रिस्तीदेशांतूनच भक्तीची कल्पना भागवतधमीयांस सुचलेली आहे ! परंतु पाणिनीस वासुदेवभक्तीचे तत्त्व माहीत असून बौद्ध व जैन धर्मतहि भागवतधमांचे किंवा भक्तीचे उल्लेख आहेत; आणि पाणिनी व बुद्ध हे दोन्ही ख्रिस्तापूर्वीचे होत हेंहि निर्विवाद आहे. यासाठी वेबरची वरील शंका पाश्चमात्य पंडितानीहि आतां निर्मूल ठरविली आहे. भक्ति हें धर्मोग आमच्याकडे ज्ञानपर उपनिषदांच्या नंतर निघालेले आहे हें वर सांगितले आहे. म्हणून ज्ञानपर उपनिषदांनंतर आणि बुद्धापूर्वी वासुदेवभक्तिपर भागवतधर्म निघाला आहे एवढे निर्विवाद होय. बुद्धापूर्वी किती शतकें*एवढाच काय तो प्रश्न आहे; व त्याचे ¥ भक्तिमान् (पाली भत्तिमा) हा शब्द थेरगार्थत (श्वेोक ३७०) आला असन एका जातकांतहि भक्तीचा उल्लेख आहे. शिवाय प्रसिद्ध फ्रेंच पाली पडित सेनातै (Senart) यानें ‘बौद्ध धर्माचे मूळ' या विषयावर १९०९ सालीं जें एक व्याख्यान दिलें त्यांत बौद्ध धर्मापूर्वी भागवृतधर्म निघालेला आहे असें स्पष्ट पतिपादन कलं आहे. “No one will clain to der 1ve from Buddhism, Vishnusm or the Yoga. Assuredly Buddhism is the borrower.”...“To sum up if there had not previously existed a religion made up of the doctrines of Yoga, of Vishnuite legends, of devotion to Vishnu-Krisnna, worshipped under the title of Bhagavata, Buddhism would not have come to birth at all,” “trasă qtās as fig Zhe Indian Inter. Areterनांवाच्या पुण येथे प्रसिद्ध हाणा-या मिशनरी त्रैमासिकाच्या आक्टोबर १९०९व जानेवारी १९१० च्या अंकात भाषांतररूपानें प्रसिद्ध झाला असून वर दिलेलीं वाक्ये