पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

A fo गीताराहम्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट लोप झाला असल्यामुळे, गीतेखेरीज भागवतधर्मावरील सध्यां उपलब्ध होणारे मुख्य ग्रंथ म्हटले म्हणजे महाभारतान्तगैत शांतिपर्वाच्या अखेर अठरा अध्यायात निरूपिलेलें नारायणीयोपाख्यान (मभा.शां.३३४-३५१), शांडिल्यसूत्रे,भागवतपुराण, नारदपंचरात्र, नारदसूत्रे व रामानुजाचार्यादिकांचे ग्रंथ, एवढेच होत. पैकीं रामानुजाचार्याचे ग्रंथ बोलून चालून सांप्रदायिकदृष्टया म्हणजे भागवतधर्माच्या विशिष्टाद्वैत वेदान्ताशीं मळ घालण्यासाठीं शालिवाहन शकाच्या सुमारें बाराव्या शतकांत लिहिलेले आहत. म्हणून भागवतधर्माचे मूळचे स्वरूप ठरावण्यास या ग्रंथावर अवलंबून रहातां येत नाहीं; आणि माध्वादि दुस-या वैष्णवसांप्रदायी ग्रंथांची गोष्टहि तशीच आहे. श्रीमद्भागवतपुराण यापूर्वीचे आहे. पण या पुराणांत आरंभीच अशी कथा आहे कीं, (भाग. स्कं १.अ.४व५ पहा), महाभारतांत, आणि अर्थातच गीतंतहि, नैष्कम्यैपर भागवतधर्माचे जें निरूपण आहे त्यांत भक्तीचे व्हावें तसें वर्णन झालेले नाहीं, आणि ‘भक्तीवांचून नुस्तें नैष्कम्र्य शोभत नाहीं,’ असें मनांत येऊन व्यासांस वाईट वाटले; व मनाची ही तळमळ काढून टाकण्यासाठीं नारदाच्या सांगण्यावरून त्यांनी भक्तीचे माहात्म्य प्रतिपादन करणारें भागवतपुराण रचिलें. या कथेचा ऐतिहासिकदृष्ट्या विचार केला तर असें दिसून येईल की, मूळ म्हणजे भारतांतील भागवतधर्मात नैष्कम्याला जें प्राधान्य होतें तें कालान्तरोनें कमी होऊन त्याऐवजीं भक्तीला जेव्हां प्राधान्य आलें तेव्हां या दुस-या स्वरूपाचा (म्हणजे भक्तिप्रधान) भागवतधर्म प्रतिपादन करण्यासाठीं भागवतपुराण ही पुरणपोळी मागाहून बनविली आहे. नारदपंचरात्र ग्रंथहि याच प्रकारचा म्हणजे शुद्ध भक्तिपर असून त्यांत द्वादश स्कंधांचे भागवतपुराण, ब्रह्मवैवर्तपुराण, विष्णुपुराण आणि गीता व महाभारत यांचा नामतः स्पष्ट निर्देश केलेला आहे (ना. पं.२. ७.२८-३२; ३. १४.७३; व ४.३.१५४ पहा). तेव्हां भागवतधर्माचे मूळचे स्वरूप ठरविण्यास हा ग्रंथ भागवतपुराणाहूनहि कमी योग्यतेचा आहे असें उघड होतें. नारदसूत्रे व शांडिल्यसूत्रे हे ग्रंथ नारदपंचरात्राहून कदाचित् प्राचीन असतील. तथापि नारदसूत्रांत व्यास व शुक (ना.सू.८३) यांचा उल्लेख असल्यामुळे तें भारतभागवतांनंतरचे, आणि शांडिल्यसूत्रांत भगवद्गीतेंतील श्लोकच घेतलेले असल्यामुळे (शां. सू. ९, १५व८३) हें सूत्र नारदसूत्रापेक्षां प्राचीन (ना.सू.८३) असले तरी गीता व महाभारत यांच्या पुढले आहे यांत शंका नाही. म्हणून भागवतधर्माचे मूळचे व प्राचीन स्वरूप काय याचा निर्णय अखेर महाभारतान्तर्गत नारायणीयाख्यानावरूनच करावा लागतो. भागवतपुराण (१.३.२४) व नारदपंचरात्र (४.३.१५६-१५९; ४.८.८१) या दोन्ही ग्रंथांत बुद्धाला विष्णूचा अवतार म्हटलें आहे. पण नारायणीयाख्यानांत वर्णिलेल्या दशावतारांत बुद्धाची गणना केली