पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४-भागवतधर्माचा उदय व गीता ५३९ यज्ञाची महती वर्णन करीत असतां “ही यज्ञविद्या घोर अ,गिरस नांवाच्या ऋषीनें देवकीपुत्र कृष्ण यास सागितली,” असें म्हटले आहे. हा देवकीपुत्र कृष्ण आणि गीतेंतील श्रीकृष्ण एकच मानण्यास कांहीं आधार नाहीं. तथापि दोन्ही एकच आहेत असें जरी क्षणभर गृहीत धरिले, तरी ज्ञानयज्ञ प्रधान मानण्यास गीतेंत घोर अांगिरसाचा कोठेच उल्लेख नाहीं हैं लक्षांत ठेविलें पाहिजे. शिवाय जनकाचा मार्ग जरी ज्ञानकर्मसमुचयात्मक होता तरी त्याच्या कालीं या मार्गात भक्तीचा समावेश झालेला नव्हता, असें बृहदारण्यकोपनिषदावरून स्पष्ट होतें. म्हणून भक्तियुक्त ज्ञानकर्मसमुचयपंथाच्या सांप्रदायक परंपरेंत जनकाची गणना होऊं शकत नाहीं, व गीतेंत केलेलीहि नाहीं. गीताधर्म युगारंभीं भगवंतांनीं प्रथम विवस्वानास, विवस्वानानें मनूस, व मनूनें इक्ष्वाकूस उपदेशिला होता; पण कालान्तरानें तो नष्ट झाल्यामुळे अर्जुनास फिरून सांगावा लागला, असें गीतेच्या चवथ्या अध्यायाच्या आरंभीं (गी. ४.१-३) म्हटले आहे. गीताधर्माची परंपरा समजण्यास हे श्लोक अत्यंत महत्त्वाचे असतांहि टीकाकारांनीं त्यांचा शब्दार्थ सागण्यापलीकडे फारसा जास्त खुलासा केलेला दिसत नाहीं: आणि कदाचित् तसें करणें त्यांस इष्टहिं नसावें असें दिसतें. कारण गीताधमें मूळांत एखाद्या विशिष्ट पंथांतला आहे, असें म्हटल्यानें दुस-या धार्मिक पंथास थोडा तेरी कमीपणा आल्याखेरीज रहात नाहीं. पण गीतेंतली ही परंपरा महाभारतान्तर्गत नारायणीयोपाख्यानांत भागवतधर्माची जी परंपरा दिली आहे त्यांतील शेवटच्या त्रेतायुगींच्या परंपरेशीं पूर्णपणें जुळत्थे हें आम्ही गीतारहस्याच्या आरंभी व गीता ४.१व२ या श्वठोकांवरील टीोपंत साधार स्पष्ट करून दाखविलें आहे. भागवतधर्माच्या व गीताधर्माच्या परंपरेंचें हें ऐक्य पाहिलें म्हणजे गीताग्रंथ भागवतधर्माचा आह असे म्हणावें लागतें; आणि त्याबद्दल कांहीं शंका असल्यास “गीतेंतु भागवतधर्मच सांगितला आहे” (मभा. शां. ३४६. १०) या महाभारतांतील वैशंपायनाच्या वाक्यावरून ती पूर्ण नाहींशी होत्ये. गीता हा औपनिषदिक ज्ञानाचा म्हणजे वेदान्ताचा स्वतंत्र ग्रंथ नसून, त्यांत भागवतधर्माचे प्रतिपादन केलेले आहे, असें याप्रमाणे सिद्ध झाल्यावर, भागवतधर्मास सोडून केलेली गीतेची कोणतीहि चर्चा अपुरी व भ्रामक होण्याचा संभव आहे हें सांगावयास नको. म्हणून भागवतधर्म केव्हां उत्पन्न झाला व त्याचे मूळ स्वरूप कसें होतें इत्यादि प्रश्नांबद्दल सूध्यां उपलब्ध होणारी माहिती येथे प्रथम थोडक्यांत देतों. या भागवतधर्मासच नारायणीय, सात्वत, किंवा पांचरात्र धर्म ही दुसरी नांवें आहत, हेंगीतारहस्यांत पूर्वीच सागितले आहे. g उपानषत्कालानंतर आणि बुद्धापूर्वी झालेल्या वैदिक धर्मग्रंथांपैकीं पुष्कळांचा