पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३८ गीतारहस्य अथवा कर्मयेोग-परिशिष्ट अवलोकन केलें असतां निष्पन्न होत्ये. यांपैकी योगतत्त्वादि योगावरील किंवा नृसिंहतापनी, रामतापनी वगैरे भक्तीवरील उपनिषदें छांदोग्यादि उपनिषदांपेक्षां अर्वाचीन आहत हें त्यांच्या भापवरून उघड आहे. म्हणून छांदोग्यादि जुन्या उपनिषदांत वर्णिलेल्या कर्म, ज्ञान किंवा संन्यास, आणि ज्ञानकर्मसमुच्चय या तिन्ही पक्षांचा उद्भव झाल्यावर मग पुढे योग व भक्ति मार्गास प्राधान्य आले आहे, असे म्हणणें ऐतिहासिकदृष्ट्या भाग पडतें. परंतु योग व भक्ति हीं साधनें याप्रमाणे जरी पुढे प्रधान मानिली गेली, तरी तत्पूर्वीच्या ब्रह्मज्ञानाचे श्रेष्ठत्व त्यानें कमी झाले नाही, व होणेंहि शक्य नव्हतें. म्हणून योगप्रधान किंवा भक्तिप्रधान उपनिषदांतूनहि ब्रह्मज्ञान हें भक्तीचे आणि योगाचे अखेरचे साध्य होय, आणि रुद्र, विष्णु, अच्युत, नारायण किंवा वासुदेव वगैरे ज्यांची भक्ति करावयाची तोंहि परमात्म्याची किंवा परब्रह्माची रूपें होत अशीं वर्णनें येत असतात (मैत्र्यु. ७.७; रामपू. १६; अमृतबिंदु. २२ वगैरे पहा). सारांश, वैदिक धर्मात वेळेवेळीं आत्मज्ञानीपुरुषांनी जीं धर्मोर्गे प्रवृतकेली ती तत्पूर्वी प्रचलित असलेल्या धर्मागांतूनच उद्भवलेली असून नव्या धमोगांचा पूर्वीच्यां धमाँगांशी मेळ ठेवणें हें वैदिक धेर्माच्या वाढीचे पहिल्यापासून चालत आलेलें मुख्य धोरण आहे; आणि निरनिराळ्या धर्मागांची एकवाक्यता करण्याचे हेंच धोरण स्वीकारून स्मृतिकारानी आश्रमव्यवस्थाधर्म पुढं प्रतिपादिला आहे. निरनिराळ्या धर्मागांची एकवाक्यता करण्याची ही प्राचीन पद्धत लक्षांत आणिली म्हणजे गीताधर्म तेवढाच एकटा या पूर्तापर पद्धतीस सोडून प्रवृत्त झाला असेल हें म्हणणे सयुक्तिक होत नाहीं. ब्राह्मणग्रंथांतील यज्ञयागादि कर्म, उपनिषदांतील ब्रह्मज्ञान, कापिल सांख्य, चित्तनिरोधरूपी योग आणि भाति अशीं जा वैदिक धमाँचीं मुख्य मुख्य अंगें त्यांच्या उत्पतिक्रमाचा सामान्य इतिहास वर सांगितला. आतां गीतेंत या सर्व धर्मागांचे जें प्रतिपादन केले आहे त्याचे मूळ काय-म्हणजे तें प्रतिपादन साक्षात् निरनिराळ्या उपनिषदांतून गीतेंत घेतलेले आहे, किंवा मध्यें आणखी एखादी पायरी आहे-याचा विचार करूं, नुस्त्या ब्रह्मज्ञानाचे विवेचन चालू असतां कठादि उपनिषदांतले कांहीं लोक गीतेंत जसेच्या तसेच घेतले असून, ज्ञानकर्मसमुच्चयपक्ष प्रतिपाद्य असतां जनकादिकांचे औपनिषदिक दाखले दिलेले आहेत. यावरून गीताग्रंथ साक्षात् उपनिषदांवरूनच रचेिलेला असावा असा समज होतो. पण गीताधर्माची गीतेंतच दिलेली परंपरा पाहिली, तर तींत उपनिषदांचा कोठेच उल्लेख नाहीं. गीतेत द्रव्यमय यज्ञापेक्षां ज्ञानमय यज्ञ ज्याप्रमाणें श्रेष्ठ ठरविला आहे (गी. ४.३३), त्याप्रमाणें छांदोग्योपनिषदांतहि एके ठिकाणीं (छां.३.१६,१७)मनुष्याचे जीवित हा एक प्रकारचा यज्ञच होय असें सांगून, अशा प्रकारच्या