पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीताध्यायसंगति ४४७

धला म्हणजे कर्म करूनहि तुला मोक्ष मिळेल; मोक्षासाठी कर्मसंन्यासच केला पाहिजे असें नाहीं;-इत्यादि कर्मयोगमार्गाचे रहस्य आतां अर्जुनाला सांगण्यांत आले आहे (२.४७-५३). ज्या पुरुषाची बुद्धि याप्रमाणें समझाली तो स्थितप्रज्ञ म्हणावयाचा असें भगवंतांनी सांगितल्यावर (२.५३), स्थितप्रज्ञ कसा वागतो तें मला सांगा असा अर्जुनानें पुनः प्रश्न केला. म्हणून दुस-या अध्यायाचे अखेर या स्थितप्रज्ञाचे वर्णेन दिलॆ अह्नेि अाणी अखैर् स्थितप्रज्ञाचे स्थितीसंच ब्राह्मी स्थिति म्हणतात असें सांगितले आहे. सारांश, अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी गीतेंत जो उपदेश केला आहे त्यास या जगांत ज्ञानी पुरुषास ग्राह्य झालेल्या “कमें सोडणें ” (सांख्य) व “कर्म करणे” (योग) या दोन निष्ठांपासूनच प्रारंभ कला असून, युद्धकां केले पाहिजे याची प्रथम सांख्यानछेप्रमाणें उपपति सांगितली. पण ही उपपति अपुरी पडत्ये असें पाहून, पुढे लागलीच योग किंवा कर्मयोगमार्गाप्रमाणे ज्ञान सांगण्यास सुरुवात केली आहे; व या कर्मयोगाचें स्वल्पाचरणहिं कसें श्रेयस्कर होतें हें सांगितल्यावर कर्मयोगमार्गात कर्मापेक्षां त्या कमीला प्रेरक झालेली बुद्धिच ज्या अथीं श्रेष्ठ मानितात त्या अर्थी स्थितप्रज्ञाप्रमाणे बुद्धि सम करून कर्मे कर म्हणजे तुला कोणतेंहि पाप लागणार नाहीं, येथपर्यंत दुस-या अध्यायांत या उपपादनाची मजल येऊन ठेपली आहे. आतां पुढे आणखी काय प्रश्न निघतात तें पाहूं. सर्व उपपादनाचे मूळ दुसच्याच अध्यायांत असल्यामुळे त्याबद्दल जरा विस्तृत विवेचन केले आहे. “कर्मयोगमार्गांतहि कर्मापेक्षां बुद्धिच जर श्रेष्ठ तर मी आपली बुद्धि स्थितप्रज्ञाच्या बुद्धीसारखी सम करितों म्हणजे झाले; मला युद्धासारखी घोर कर्म करावयास कां सांगतां ?”असा तिसच्या अध्यायाच्या आरंभीं अर्जुनाचा प्रश्न आहे. कारण, कर्मापेक्षां बुद्धि श्रेष्ठ म्हटल्यानें “युद्ध कां करावें ? बुद्धि सम ठेवून उदासीन कां बसू नये ?” या प्रश्नाचा निर्णय होत नाहीं.बुद्धि समठेवूनहि कर्मसंन्यास करितां येत नाहीं असें नाहीं. मग समबुद्धि पुरुषास सांख्यमागीप्रमाणें कर्म सोडण्यास हरकत काय? या प्रश्नाचे उत्तर भगवान् आतां असे देतात कीं, पूर्वी तुला सांख्य व योग अशा दोन निष्ठा सांगितल्या खन्या; परंतु कोणाहि मनुष्यास कमें सर्वथैव सुटणें अशक्य आहे. जॉपर्यंत तो देहधारी आहे तोपर्यंत प्रकृति स्वभावतःचे त्याला कर्म करावयास लावणार; आणि प्रकृतीचीं हीं कर्मे जर सुटत नाहीत, तर इंद्रियसंयमनानें बुद्धि स्थिर व सम करून केवळ कर्मेद्रियांनीच आपलीं कर्तव्यकर्म करीत रहाणें हें आधक श्रयस्कर होय. यासाठी तूं कमें कूर, कमें न केलीस तर तुलु खायाला देखील मिळणार नाहीं (३.३-८). कर्म हें परमेश्वरानेंच उत्पन्न आहे; मनुष्यानें नाहीं. ब्रह्मदेवानें सृष्टि व प्रजा उत्पन्न केली त्या वेळींच ‘यज्ञ'