पान:गाव झिजत आहे.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०. तर आत्महत्या थांबतील

गेल्या दोन-तीन वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, अर्थतज्ज्ञ आणि शेतकीतज्ज्ञ आत्महत्येच्याप्रश्नांवर बोलत आहेत. शासनानेही आत्महत्या थांबाव्यात म्हणून काही उपाययोजनाजाहीर केली आहे. शेतकऱ्यांसाठी पंतप्रधानांनी पॅकेज जाहीर केले आहे. देशाच्या कृषिमंत्री आणि पंतप्रधानांनी आत्महत्या घडलेल्या विदर्भाचा दौरा करून शेतकऱ्यांनाकर्जमुक्तीसाठी योजना जाहीर केल्या आहेत. तरीही विदर्भ आणि मराठवाड्यातआत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले तरआत्महत्या करणाऱ्या थांबतील असे काही तज्ज्ञांचे मत आहे. कर्जावर व्याजाचे प्रमाणजास्त आहे असे काहींनी निदर्शनास आणून दिल्यामुळे कर्जमाफीबरोबरच व्याजाचे दरकमी करावेत अशी काहींनी मागणी केली आहे.  कर्ज माफ केले तर आत्महत्या थांबतीलच असे ठामपणे कोणीही सांगू शकतनाही. व्याज किंवा कर्जमाफ केले तर शेतकऱ्यांचा एक प्रश्न सुटेल पण दैनंदिन व्यवहारभागविण्यासाठी त्याच्या हातात पैसा येईल का हा खरा प्रश्न आहे. कर्जमाफी किंवाव्याजमाफीमुळे दररोजच्या जगण्यातील त्याच्या अडचणी दूर होत नाहीत. ज्याशेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या तो सुटला! पण त्याच्या कुटुंबाचे काय? म्हणून कर्जमाफी किंवा व्याजमाफी ही शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करण्याचीसुरुवात आहे. शेतकऱ्याला सुखी करण्याचे ते पहिले पाऊल आहे. कर्जमाफीपासून याउपक्रमाची सुरुवात करावी. मात्र शेतकरी भविष्यात सुखी व्हावा म्हणून आणखीन काहीउपाययोजना करणे गरजेचे आहे. तर आत्महत्या थांबतील / ८७