पान:गाव झिजत आहे.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९. यंत्रे आली-जनावरे कमी झाली

गावात शेती उत्पादनासाठी अनेक प्रकारची यंत्रसामुग्री वापरली जाऊ लागलीआहे. त्याची सुरवात ट्रॅक्टरपासून झाली. ट्रॅक्टरमुळे नांगरणी होते, कोळपणी होतेएवढेच नव्हे तर काढणीसुद्धा शक्य झाली आहे. कमी श्रमात, कमी वेळात शेतातीलकामे करून घेता येतात म्हणून ट्रॅक्टर हे आता शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे.सुरुवातीच्या काळात ट्रॅक्टरने शेती नांगरणे शेतकऱ्याला पसंत नव्हते. माझ्या गावात पन्नास वर्षांपूर्वी गावच्या देशमुखांनी ट्रॅक्टर आणला, पण नांगरणीसाठी त्याचा कोणीवापर केला नाही. कोणीतरी गावात अफवा पसरविली की, ट्रॅक्टरने शेती नांगरली कीजमीन गरम होते, पीक येत नाही. देशमुखाला ट्रॅक्टर परत पाठवावा लागला. पण आजलेला दिसतो. कारण बहुतेक गावांतून शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापरमोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आता तर नांगरणीपासून धान्याचे पोते भरण्यापर्यंतची सर्व कामे यंत्राद्वारे करता येतात,पूर्वीच्या काळी शेती कसण्यासाठी जनावरांचा वापर होत होता. च्याकडेबैल बारदाना मोठा तो शेतकरी मोठा असा समज होता आणि तो खराही होता. बैलआणि हल्यांना नांगरणीपासून खळे करण्यापर्यंत सर्वच कामांना वापरले जायचे. त्यांनाजन्म देणाऱ्या गाई-म्हशीदेखील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात होत्या. शेतमजुरांकडेम्हैस, गाय किंवा किमान शेळीतरी असायची. या सर्व जनावरांचा उपयोग दुधासाठीपूर्वीही होत होता तसाच आजही होतो. या जनावरांएवढा शेतकऱ्यांचा दुसरा मित्रकोणीच नसेल! कारण दूध, शेण, मूत्र आणि मेल्यावर कातडेदेखील मानवजातीच्यायंत्रे आली-जनावरे कमी झाली / ८३