पान:गाव झिजत आहे.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झालेल्या मुलींच्या पुनर्विवाहाचे प्रमाण फारसे वाढलेले नाही. मुलींनी पुनर्विवाहकरण्यासंबंधी ग्रामीण भागातील पालकांच्या आणि समाजाच्या मानसिकतेत फारसाबदल झालेला नाही. समाजधुरीणही यासाठी विशेष प्रयत्न करीत नाहीत.  विधवा महिलेचे घरात स्थान काय? तर तिला जनावराप्रमाणे घरात काम करावेलागते. आयुष्यभर घरातील माणसांचे टोमणे ऐकणे आणि तरीही त्यांच्यासाठीकाबाडकष्ट करणे हाच तिचा धर्म होऊन बसला आहे. क्वचितच एखाद्या विधवेच्यानशिबी घरातील लोकांची सहानुभूती आणि प्रेम वाट्याला येते. एखाद्या कैद्यालाजेलमध्ये ठेवावे तसे आयुष्यभर ती कुटुंबातल्या जेलमध्येच जगत असते. ग्रामीण भागातील समाजाने दुर्लक्षिलेल्या या सर्व महिला आहेत. यांच्यासाठी कुटुंबात वागावकऱ्यांत आपुलकीची आणि सहानुभूतीची कुठलीही जागा नाही. गावातील महिलाहे गावचे वैभव असले पाहिजे. संस्कृता स्त्री पराशक्तिः सुसंस्कृत स्त्री सर्वश्रेष्ठ शक्तीआहे असे वचन आहे. परंतु प्रत्यक्षात स्त्रीला गेल्या हजारो वर्षांपासून 'सुसंस्कृत'करणाऱ्या शिक्षणापासून वंचित केले आहे. एकेकाळी समाजात महिलांबद्दल एकूणच जो मान, सन्मान, आदर होता तो लयाला जात आहे. महिलांवरील अत्याचार आणिअन्याय गावागावातून वाढले आहेत. हे कोणत्या प्रगतीचे लक्षण?  लितांना शिक्षणात सवलती मिळाल्या. नोकऱ्यांत आरक्षण मिळाले,ओबीसीलाही ही संधी प्राप्त झाली. आरक्षणाचे आणि संधी देण्याचे हेच सूत्र शासनानेमहिलांसाठी अंमलात आणण्याचे ठरविले आहे. पण हे पुरुषवर्गाला मान्य नाही. काहीवर्षांपूर्वी मानवलोकने ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या बारा तालुक्यांतील महिलांचेसर्वेक्षण केले होते. ते सर्वेक्षण असे सांगते, सरपंच महिलेचा कारभार तिचा नवरा किंवादीरच पाहतो. अनेक वेळा मीटिंगलाही तोच हजर असतो. निवडून आलेल्या महिलाएकट्या-दुकट्या शहराच्या ठिकाणी सभा-संमेलनाला जात नाहीत. कारण त्यांच्याघरातील पुरुषमंडळींना ते पसंत नसते. हा त्यांच्यावरील अविश्वास आहे. आजही हीपरिस्थिती बदललेली नाही. जे राजकारणात घडते तेच अर्थकारणातही आहे. तेच मालकी हक्कासंबंधीहीघडत आहे. किल्लारीच्या भूकंपात नव्याने बांधलेल्या घराची मालकी नवरा-बायकोच्यानावाने नोंदवावी असा स्वयंसेवी संघटनांनी आग्रह धरला होता. तो त्या भागातील पुरुषमंडळींना त्यावेळी फारसा पटला नाही. अर्थात त्यावेळचे मुख्यमंत्री श्री.शरदचंद्रजीपवार यांनी स्वयंसेवी संस्थेची ती मागणी पूर्ण केली आणि आता तर महाराष्ट्र८०/ गाव झिजत आहे