पान:गाव झिजत आहे.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साचा:Centerप्रकाशकी गाव झिजत आहे पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध करताना आम्हांला आनंद आहे. दै. लोकमत वृत्तपत्राने गाव झिजत आहे संदर्भातील वीस लेख प्रसिद्ध केले होते. त्या अनुषंगाने गेली सहा महिने मी व माझी पत्नी सौ. छाया उभयतांनी या लेखांचा अभ्यास केला व प्रकर्षाने जाणवले की, खऱ्या अर्थाने ग्रामीण विकास करावयाचा असेल तर गावांची प्रथम झीज थांबली पाहिजे. यावर सर्वांनी चिंतन करणे गरजेचे आहे. असे आम्हांला प्रामाणिकपणे वाटते. म्हणून डॉ. लोहिया लिखित गाव झिजत आहे हे पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार मनात आला. साचा:Paragraph breakग्रामीणविकासासाठीअहोरात्र धडपडणाऱ्या कार्यकर्त्यानां मग ते शासकीयअसोत किंवा सेवाभावी संस्थेतले या सर्वांना ही पुस्तिका उपयुक्त ठरेलअसा विश्वास वाटतो. साचा:''''ठळक मजकूरrightश्री. सतिश काकडे''' {{gap leftसाचा:दहा / गाव झिजत आहे|}}