पान:गाव झिजत आहे.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९९१च्या जणगणनेत राज्याच्या ग्रामीण भागात दरहजार पुरूषांमागे महिलांचे प्रमाण९७२ इतके होते. हेच प्रमाण २००१ मध्ये ९५९ इतके झाले. याला कारण खेड्यांमधूनस्त्री-पुरुष समानतेसंबंधीची जाणीव निर्माण करण्यात शासन आणि आपण अपयशीठरलो हे आहे. जन्मापूर्वीच स्त्री-भ्रूणहत्या करण्यात काही महाभाग स्वत:ला धन्यसमजतात. जन्मानंतरही स्त्रियांच्या मागे लागलेली साडेसाती कमी झालेली नाही.  स्त्रियांचे प्रमाण घटत असतानाच परित्यक्तांचा-नवऱ्याने टाकलेल्यामहिलांचा- प्रश्नदेखील गंभीर बनत चालला आहे. कारणे अनेक असतील. पणत्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. प्रत्येक गावांत जसे आठ-दहा टक्के निराधार वृद्धआहेत तशीच परित्यक्तांची संख्याही आहे. या संख्येप्रमाणेच त्यांचे प्रश्नही आहेत.शरीरश्रम हे खेड्यातल्या उपजीविकेचे मुख्य भांडवल आहे. पण १४ वर्षांखालील ४० टक्के मुले, ६० वर्षांच्या वरती १० टक्के वृद्ध माणसे अशी ५० टक्के लोकसंख्या उत्पादककामे करीतच नाहीत. त्यात भर निराधार, परित्यक्ता महिलांची पडत आहे.बालविधवांचे प्रमाण फारसे घटलेले नाही. या बालविधवा आणि परित्यक्ता जेव्हाम्हाताऱ्या होतात तेव्हा त्यांना सासरचे किंवा माहेरचे अंगणातही थारा देत नाहीत.अतिशय विपन्न अवस्थेत त्यांना जगावे लागते. १९८९ पासून मानवलोकने हेल्पेजइंडियाच्या मदतीने १५० वृद्धांना सातत्याने सर्व प्रकारचे सहकार्य केले आहे. या १५०वृद्धांमध्ये १११ बालविधवा किंवा परित्यक्ता महिला आहेत. त्यांच्या कहाण्या ऐकल्यातर त्या जगत आहेत की जगण्याची शिक्षा भोगत आहेत हेच कळत नाही. एकीकडेधिंडकाढण्यात आनंद मानतो ही विकृती नव्हे तर काय? स्वातंत्र्यानंतर महिलांना मतदानाचाहक्क मिळाला एवढीच काय ती प्रतिष्ठा त्यांना मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीघटनासमितीमध्ये महिलांच्या मतदानाचा आग्रह धरला नसता, तर महिला जगतालादुय्यम दर्जाचे नागरिकत्व प्राप्त झाले असते. आजही मतदानाचा आणि ३३ टक्क्यांचाहक्क सोडला तर महिलांच्या पदरात आम्ही काय टाकले आहे?ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार झाला. त्यात महिलाही मागे नाहीत. असेअसतानाही त्यांच्यावरील अन्याय, अत्याचाराच्या प्रमाणात घट झालेली दिसत नाही.आपली जबाबदारी झटकून टाकण्यासाठी ग्रामीण भागात १८ वर्षांच्या आतील मुलींचेलग्न पालक लावून देतात. यात बीड जिल्हा पहिला आहे. जीटीझेड च्याअहवालाप्रमाणे बीड जिल्ह्यात ५७ टक्के मुलींचे विवाह १८ वर्षांच्या आत होतात असेम्हटले आहे. इतर जिल्ह्यांतही कमीअधिक असेच चित्र आहे. तरुण वयात विधवा ७८ / गाव झिजत आहे